Goa News : भाजपच्या नकारात्मक धोरणांचा देशाला फटका : कॉंग्रेस नेते शशी थरूर

Goa News : युवकांना आपल्या व देशाच्या अस्तित्वासाठी व लोकशाहीच्या रक्षणार्थ आपली मते निर्भीडपणे मांडणे आवश्यक आहे. मतदान हा घटनेने दिलेला अधिकार असुन त्याचा योग्य वापर करा व बदलासाठी मत द्या असे आवाहन त्यांनी केले.
Shashi Tharoor
Shashi TharoorDainik Gomantak

Goa News :

सासष्टी, भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षांच्या राजवटीत देशासाठी अनेक नकारात्मक धोरणांचा फटका बसला आहे.

भाजप सरकारने अनेक स्वायत्त संस्थांवर घाला घातला व त्यांच्या अधिकारावर मर्यादा आणल्या,असे कॉंग्रेस नेते शशी थरुर यांनी शुक्रवारी संध्याकाळी कॉंग्रेस युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. या सर्व प्रकारामुळे युवकांवरील जबाबदारी वाढली आहे, असे ‘लोकशाहीच्या रक्षणार्थ युवकांची भूमिका’ या विषयावर बोलताना थरुर यांनी सांगितले.

देशात व्यक्तिगत स्वातंत्र्यावरही बंधने घातली जात आहेत. अशा या देशात तुम्हाला वाढायचे आहे काय, असा प्रश्र्न करून थरुर यांनी पुढे सांगितले की, युवकांपुढे रोजगार, करिअर हे प्रश्र्न आ वासून समोर उभे आहेत.

युवकांना आपल्या व देशाच्या अस्तित्वासाठी व लोकशाहीच्या रक्षणार्थ आपली मते निर्भीडपणे मांडणे आवश्यक आहे. मतदान हा घटनेने दिलेला अधिकार असुन त्याचा योग्य वापर करा व बदलासाठी मत द्या असे आवाहन त्यांनी केले.

Shashi Tharoor
Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

गोव्यात व केरळात ४० टक्के बेरोजगारी आहे. ती नष्ट करण्यासाठी कॉंग्रेसकडे अनेक योजना आहेत. लोकशाही व मूल्ये जपण्यासाठी आवाज उठविण्याचे आवाहन त्यानी या वेळी युवकांना केले.

विविधता हेच देशाचे वैशीष्ट्य असुन ते जपण्यासाठी युवकांनी पुढे यावे व भारतीय म्हणुन अभिमान बाळगावा असेही थरुर यानी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com