मडगाव: भाजप सरकारने (BJP Government) डेंटल महावियालयाचे (Dental College) सेमिस्टर शुल्क 1 लाख रुपयांपर्यंत वाढवून विद्यार्थ्यांना लूटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी बुधवारी सांगितले की, जागरूक तरुणांमुळे सरकारला शुल्क कमी करून 48 हजार रुपये करण्यास भाग पाडले. फातोर्डाचे आमदार सरदेसाई यांनी समाज माध्यमावर हा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला युवकांकडून आणि दंत विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे सरकारला शुल्क कमी करण्यास भाग पाडले गेले.
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी शुल्क वाढवून विद्यार्थ्यांवर बोजा टाकण्याचा प्रयत्न केला हे लज्जास्पद कृत्य आहे. या इच्छुक दंत विद्यार्थ्यांनी आपले करिअर सेवेसाठी समर्पित करण्याचे ध्येय ठेवले आहे, परंतु या प्रणालीमध्ये येण्यापूर्वीच सरकार त्यांच्यासमोर आर्थिक अडथळे निर्माण करत आहे. हे असंवेदनशील भाजप सरकार त्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी दंत क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना निराश करत आहे. ” असे सरदेसाई म्हणाले.
“मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कुटुंबांच्या आर्थिक अडचणी दिसत नाहीत. अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, या परिस्थितीत कुटुंबे असा शुल्क कशी भरतील. ” असा प्रश्न सरदेसाईंनी केला. डॉक्टरांनीही सरकाराच्या या कृत्यावर आक्षेप घेत शुल्क वाढवणे ही चूक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. हे सरकार, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संकटात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. “या सरकारला हृदय तर नाहीच आणि या सेमेस्टर फी वाढवण्याच्या या कृतीने हे देखील सिद्ध केले आहे की मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत त्यांची तिजोरी रिकामी झाल्याने विद्यार्थ्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत.’’ असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.