Water Testing: पिण्याचे पाणी मिळणार आणखीन नितळ! चाचणी क्षेत्रात क्रांतीकारी शोध! खास उपकरणाची ‘बिट्‌स पिलानी’मध्ये निर्मिती

BITS Pilani water testing device: आरोग्यास अपायकारक असे पाण्यातील जड धातू शोधणारे महत्त्वपूर्ण उपकरण ‘बिटस पिलानी’ संस्थेच्या संशोधकांनी विकसित केले आहे.
Clean Water
WaterDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आरोग्यास अपायकारक असे पाण्यातील जड धातू शोधणारे महत्त्वपूर्ण उपकरण ‘बिटस पिलानी’ संस्थेच्या संशोधकांनी विकसित केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या उपकरणासाठी पेटंटही मिळविले आहे.

जड धातूंचे प्रदूषण हे मानवी आरोग्य आणि परिसंस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी बिट्स पिलानी, के. के. बिर्ला गोवा कॅम्पस येथील संशोधकांनी एक नवकल्पना विकसित केली असून, ‘पाण्यातील जड धातूंच्या आयनचे शोध घेणारे इलेक्ट्रोकेमिकल मायक्रोफ्लुईडिक उपकरण’ या शीर्षकाने त्यांनी त्याचे पेटंटही प्राप्त केले आहे.

Clean Water
Water Crisis: मार्चमध्ये पाण्याची ही स्थिती, तर एप्रिल-मेमध्ये काय? मल्टिप्लेक्स, बंगल्यांमुळे राज्‍यात पाणीटंचाई; फेरेरांचे आरोप

भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने ३१ मार्च रोजी या शोधाला अधिकृत मान्यता दिली असून, पर्यावरण सुरक्षा आणि पाणी चाचणी क्षेत्रात या उपकरणामुळे क्रांती घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या नाविन्यपूर्ण उपकरणाचा शोध प्रा. जेगथ नंबी कृष्णन यांनी त्यांचे विद्यार्थी कृष्णा गुप्ता (२०१२-२०१६) आणि आर्या अग्रवाल (२०१७-२०२२) यांच्या साहाय्याने रसायन अभियांत्रिकी विभागात लावला. हे उपकरण पाण्यातील धोकादायक जड धातूंच्या आयनचा शोध घेण्यासाठी स्वस्त, जलद आणि अत्यंत संवेदनशील पर्याय प्रदान करते.

Clean Water
Goa Water Crisis: गोव्यात पाणीटंचाईचे संकट? 'जलसंपत्ती'ची अनेक कामे अर्धवटच; 15 पैकी फक्त 4 प्रकल्प पूर्ण

ग्रामीण भागांसाठी उपयुक्त पर्याय

औद्योगिक सांडपाणी व जलप्रदूषणाच्या चिंतेमुळे हे उपकरण पर्यावरण विभाग, उद्योगसमूह तसेच ग्रामीण भागातील जलगुणवत्ता कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरू शकते. जिथे थेट घटनास्थळी जड धातूंची ओळख पटवण्यासाठी हे उपकरण वापरता येईल, तिथे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय ठरू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com