Bicholim News : युवकांनी पारंपरिक शेतीकडे वळावे : डॉ. चंद्रकांत शेट्ये

Bicholim News : मेणकुरे, साळ येथे खत, बियाण्यांचे वाटप
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, कृषी क्षेत्रात राज्याला ‘सुजलाम् सुफलाम्’ करणे हे सरकारचे ध्येय आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी खास करून आजच्या युवा पिढीने शेती व्यवसायात उतरून कृषी क्षेत्रात राज्यासह देशाला समृद्ध बनविण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.

कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी अधिकाधिक शेती लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

डिचोली शिक्षा व्हिजनच्या माध्यमातून आज रविवारी (ता. १६) डिचोली मतदारसंघातील मेणकुरे आणि साळमधील शेतकऱ्यांना खत आणि भात बियाण्यांचे वाटप केल्यानंतर शेट्ये बोलत होते. दोन्‍ही ठिकाणी सुमारे ५५० शेतकऱ्यांना खत आणि बियाण्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून आमदार शेट्ये अध्यक्ष असलेल्या शिक्षा व्हिजन या संस्थेतर्फे शेतकऱ्यांना ही मदत दिली जात आहे.

Bicholim
Goa Crime News: नवजात अर्भकाचे आढळले फक्त पाय, शरीर गायब; डोंगरी-मंडूर परिसरात खळबळ

मेणकुरे येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी सरपंच गुरुदास परब यांच्यासह पंचसदस्य प्रदीप रेवोडकर, भाजप मंडळ अध्यक्ष विश्‍‍वास गावकर, सचिव डॉ. कौस्तुभ पाटणेकर, किसान मोर्चाचे करमळकर, शिक्षा व्हिजनचे दिलीप धारगळकर उपस्थित होते. तर, साळ येथे झालेल्‍या कार्यक्रमाला सरपंच सावित्री घाडी, पंचसदस्य वैष्णवी परब, विशाल परब यांची उपस्थिती होती.

राज्‍यात हरित क्रांती व्‍हावी यासाठी सरकार प्रयत्‍नशील आहे. जास्‍तीत जास्‍त युवकांनी शेतीकडे वळून स्‍वावलंबी बनावे यासाठीही विविध योजना, उपक्रम आखले जात आहे. त्‍यामुळेच शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन देणे काळाची गरज आहे. त्‍यादृष्‍टीने आमदार या नात्‍याने मी प्रयत्‍न करत आहे.

- डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार (डिचोली)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com