Bicholim News : चित्रकारांना पाठिंबा द्या : चंद्रकांत शेट्ये

Bicholim News : डिचोलीत ''ॲक्रेलिक पेंटिंग'' स्पर्धा उत्साहात
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, चित्रकार हे भावनिक असतात, न बोलता चित्रांच्या माध्यमातून ते भावना व्यक्त करतात. अशा चित्रकारांना पाठिंबा देणे हे समाजाचे कर्तव्य आहे, असे मत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केले.

डिचोली सम्राट क्लब आयोजित ''ॲक्रेलिक पेंटिंग'' स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात डॉ. चंद्रकांत शेट्ये बोलत होते. रविवारी डिचोलीत आयोजित केलेल्या या सोहळ्यावेळी सम्राट क्लब राज्यचे अध्यक्ष अवीन नाईक, सचिव प्रसाद नाईक, गट अध्यक्ष अमोल बेतकीकर, डिचोली सम्राट क्लबचे अध्यक्ष राहुल कवळेकर, खजिनदार गोपाळ मोरजकर, भारत चणेकर, परीक्षक राजमोहन शेट्ये, प्रमोद गावकर आणि अन्य उपस्थित होते.

Bicholim
Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

साईल पेडणेकर प्रथम

ॲक्रेलिक पेंटिंग स्पर्धेत साईल पेडणेकर याने प्रथम रोख ५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. रोख ४ हजार रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस शुभम गावडे याला तर प्रतीक च्यारी याला रोख ३ हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. नीतेश तेंडुलकर आणि शशांक शिरसाट यांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले.

फाईन आर्टच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसाठीही ही स्पर्धा मर्यादित होती. बाजारातील सार्वजनिक गणपती पूजन मंडपात घेतलेल्या या स्पर्धेला समाधानकारक प्रतिसाद मिळाला. राजमोहन शेट्ये आणि प्रमोद गावकर यांनी परीक्षण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com