Bicholim SSC Result 2024 : ‘शांतादुर्गा’ची पूजा भिडे प्रथम; दहावीचा निकाल ९९ टक्के

Bicholim SSC Result 2024 : गोवा शालांत मंडळाने यावर्षी घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९९ टक्के लागला असून, सहा विद्यार्थ्यांनी ९० आणि त्याहून अधिक गुण संपादन केले आहेत. यावर्षी या विद्यालयातून १८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
Bicholim SSC Result 2024
Bicholim SSC Result 2024Dainik Gomantak

Bicholim SSC Result 2024 :

डिचोली, विद्यावर्धक मंडळ संचलीत येथील श्री शांतादुर्गा विद्यालयाने यंदाही दहावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

गोवा शालांत मंडळाने यावर्षी घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९९ टक्के लागला असून, सहा विद्यार्थ्यांनी ९० आणि त्याहून अधिक गुण संपादन केले आहेत. यावर्षी या विद्यालयातून १८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

पैकी ४५ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ७७ विद्यार्थी प्रथम तर ५५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पूर्वा भिडे ही विद्यार्थिनी ९४.१७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

Bicholim SSC Result 2024
Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

या सोहळ्याप्रसंगी विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, सचिव अभिजीत तेली, खजिनदार राजेश धोंड, साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, शिशुवाटिकेचे व्यवस्थापक डॉ. कौस्तुभ पाटणेकर, विद्यालयाच्या सहमुख्याध्यापिका यास्मिन शेट आणि हरिप्रकाश ठाकूर उपस्थित होते. तन्वी पळ यांनी सूत्रसंचालन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

गुरुवारी शाळेत आयोजित केलेल्या एका सोहळ्यात पूर्वा भिडे, ईशान परब (९२.६७ टक्के), सुसाज नाईक (९१.८३ टक्के), दीक्षा गावकर (९१.३३ टक्के), सानिका देसाई (९०.६७ टक्के) आणि श्रावणी टोपले (९०.१७ टक्के) अशा ९० आणि त्याहून अधिक गुण संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com