Bicholim News : डिचोलीत दोन दुकानांना भीषण आग; ‘मिनी सुपर मार्केट’ भस्मसात

Bicholim News : बोर्डे येथील घटनेत आठ लाखांचे नुकसान
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News :

डिचोली, बोर्डे - डिचोली येथे एकमेकांना टेकून असलेल्या दोन दुकानांना आग लागून आठ लाखांहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. आगीच्या या घटनेत ‘भूमिका स्टोअर्स’ हे ‘मिनी सुपर मार्केट’ पूर्णपणे बेचिराख झाले.

तसेच बाजूच्या शिलाई (टेलरिंग) दुकानाला आगीची झळ बसली. आज पहाटे साडेतीन वाजल्यानंतर आगीची ही घटना घडली.

डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच लिडींग फायर फायटर प्रल्हाद देसाई यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली व एक तासाहून अधिक वेळ शर्थीचे प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली. ही आग नेमकी कशी लागली, ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तरीदेखील ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात डिचोलीच्या जुन्या बाजारात तीन दुकाने आगीत भस्मसात झाली होती. त्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यात शहरातील एका फ्लॅटला आग लागून लाखोंची हानी झाली होती. त्यानंतर आज लागलेली आग ही मोठी घटना आहे.

मोठा अनर्थ टळला :

ज्या दुकानांना आग लागली, त्या दुकानांना लागूनच अन्य दोन गाळे आहेत. एका गाळ्यात तर भरलेले गॅस सिलिंडर होते. आगीची झळ जर या गाळ्यांना बसली असती, तर मोठी आपत्ती ओढवली असती.

आग लागलेल्या दुकानांच्या मागील बाजूने सरकारी शाळा इमारत तर समोरच्या बाजूने निवासी घरे आहेत. मात्र, आग वेळीच नियंत्रणात आल्याने संभाव्य धोका टळला. अग्निशमन खात्याचे उपसंचालक श्री. रायकर आणि डिचोली दलाचे अधिकारी राहुल देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी आगीची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.

Bicholim
Romantic Places For V-Day Celebration: कपल्सला खुणावणाऱ्या 'या' 5 रोमँटीक ठिकाणी भेट देऊन साजरा करा व्हलेंटाईन

फर्निचरसह इतर साहित्य खाक

बोर्डे वडाजवळ म्हावळिंगेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला टेकून ‘भूमिका स्टोअर्स’ हे मिनी सुपर मार्केट आणि शिलाईचे मिळून दोन दुकाने एकमेकांना टेकून आहेत. आगीच्या घटनेत सुपर मार्केटमधील रेफ्रिजरेटर, फर्निचर साहित्य, किराणा माल पूर्णपणे जळून खाक झाले, तर शिलाईच्या दुकानाला आगीची झळ बसली.

सुपर मार्केट देवयानी देवानंद घोलकर यांच्या मालकीचे, तर शिलाई दुकान हे त्यांच्याच जाऊबाई रेश्मा घोलकर यांचे आहे. आगीच्या या घटनेत आठ लाखांहून अधिक रुपयांची नुकसानी झाली आहे, असा अंदाज दुकानमालक घोलकर यांनी व्यक्त केला आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे निदर्शनास येताच, त्या बाजूने जाणाऱ्या नंदकिशोर मावळणकर यांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com