Goa News : २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणू; वन्यजीव संशोधक अमित सय्यद यांचा दावा

Wildlife Researcher Amit Syyed : मात्र, सर्पदंश झालेल्यांचे प्राण वाचविण्यासाठी फाऊंडेशनने ‘प्रथमोपचार किट’ तयार केले आहे. या प्रथमोपचार पद्धतीने आतापर्यंत अनेकजणांचे प्राण वाचले आहेत, असा दावा अमित सावंत यांनी केला आहे.
Wildlife Researcher Amit Syyed
Wildlife Researcher Amit Syyed Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली, सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी त्याचबरोबर मानव आणि सापांमधील संघर्ष कमी करण्यासाठी गोवाभर कार्य करणार आहेत.

२०३०पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचे फाउंडेशनचे लक्ष्य आहे, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव संशोधक आणि ब्रेथलेस बायो-सायन्सेस फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक अमित सय्यद (सातारा) यांनी केली.

गुरुवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी अमित सय्यद यांनी फाऊंडेशनच्या एकंदरीत कार्यपद्धतीविषयी माहिती देऊन डिचोलीतील कार्यालयाचा शुभारंभ केला. याप्रसंगी ॲनिमल रेस्क्यू स्कॉडचे अमृतसिंग उपस्थित होते.

मानव आणि वन्यप्राणी यांच्यामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रेथलेस बायो-सायन्सेस फाऊंडेशन ही संस्था मानव आणि सापांमधील संघर्ष कमी करण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असे अमित सय्यद यांनी सांगितले.

शाळांमधून जागृती :

राज्यातील विविध शाळांमधून कार्यशाळा आयोजित करून ‘प्रथमोपचारा’संबंधी जागृती करण्यात येणार आहे. सर्पदंश झाल्यानंतर प्रभावी आणि शास्त्रीय पद्धतीने प्रथमोपचार कसे करावेत. त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यांना या मोहिमेत स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. त्यांचे स्वागत आहे, असे अमित सय्यद यांनी सांगितले.

Wildlife Researcher Amit Syyed
Dr N Kalaiselvi यांची CSIR आणि DSIR च्या महासंचालक पदी नियुक्ती; प्रथमच एका महिलेला संधी

मजूरवर्ग सर्पदंशाचे बळी :

सर्पदंश होण्याचे प्रमाण शेतकरी आणि मजूरवर्गात अधिक आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने प्रथमोपचार करण्यात येत असल्यामुळे बऱ्याचदा कष्टकरी लोकांना प्राणास मुकावे लागत आहे.

मात्र, सर्पदंश झालेल्यांचे प्राण वाचविण्यासाठी फाऊंडेशनने ‘प्रथमोपचार किट’ तयार केले आहे. या प्रथमोपचार पद्धतीने आतापर्यंत अनेकजणांचे प्राण वाचले आहेत, असा दावा अमित सावंत यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com