
डिचोली: पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका २३ वर्षीय बिहारी युवकाला अटक केली आहे.
संदेश देवेंद्र मुखीया असे अटक केलेल्या संशयित युवकाचे नाव आहे. तर पिडीत अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. डिचोली परिसरात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याचे प्रकार वाढले असून, गेल्या वर्षभरात अशा तीन घटना घडल्या आहेत.
या तिन्ही प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे, तिन्ही अपहरण प्रकरणात परप्रांतीयांचा हात असल्याचे उघड झाले आहे. सात महिन्यापूर्वी डिचोली शहरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते.
उपनिरीक्षक कृष्णा गावस यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक बिहार येथे पाठवण्यात आले. बिहार पोलिसांच्या सहकार्याने पोलिस पथकाने सापळा रचून संशयित युवकाला ताब्यात घेऊन पिडीत मुलीची सुटका केली. नंतर कायदेशीर सोपस्कार करून संशयित युवकासह पिडीत मुलीला डिचोलीत आणले.
कारवाई पथकात अंकित बाले, चैताली गावडे यांचा समावेश असून उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनाली हरमलकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.