Bicholim: कारापूर-सर्वण पंचायतीचा 'गडबड घोटाळा' गोमन्‍तकने केला उघड, गायब' झालेली कचरावाहू वाहने अचानक प्रकटली!

Bicholim Garbage Truck Scam: ‘स्वच्छ मिशन’अंतर्गत कारापूर-सर्वण पंचायतीला दिलेली आणि गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून गायब असलेली ‘ती’ दोन्ही कचरावाहू वाहने अखेर शनिवारी अचानक अवतरली.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : ‘स्वच्छ मिशन’अंतर्गत कारापूर-सर्वण पंचायतीला दिलेली आणि गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून गायब असलेली ‘ती’ दोन्ही कचरावाहू वाहने अखेर शनिवारी अचानक अवतरली.

दै. ‘गोमन्तक’च्‍या वृत्ताची दखल घेत रातोरात ही वाहने आता पंचायत कार्यालय इमारतीच्या मागच्या बाजूने उभी करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. सदर कचरावाहू वाहने गायब असल्याचे वृत्त ‘गोमन्तक’मध्‍ये प्रसिद्ध होताच कचरावाहू वाहने अचानक पंचायतीजवळ असल्याचे आढळून आल्याने ही कचरावाहू वाहने गायब होती. कचरा गोळा करण्यासाठी सोडाच, मागील जवळपास दोन महिन्यांपासून ही वाहने गायब होती.

सदर दोन्‍ही वाहने एका महिला पंचसदस्यांच्या ताब्यात आहेत, अशा आशयाचे वृत्त शनिवारी (३१ मे) रोजी ‘गोमन्तक’मध्‍ये प्रसिद्ध झाले होते. त्‍यामुळे ग्रामपंचायतीत व गावात एकच खळबळ माजली होती.

अखेर त्‍याच दिवशी सायंकाळी ही वाहने अचानक कारापूर येथील पंचायत कार्यालयाच्या मागच्या बाजूने गुपचूप ठेवलेली आढळूनआली. पण ती वाहने का ‘गायब’ केली होती, हा प्रश्‍‍न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com