Bicholim: सोपोचे संकट टळले, मात्र पावसाचे विघ्न! डिचोली चतुर्थी बाजारात पाणी; माटोळी’चे सामान गेले वाहून

Bicholim Market: डिचोलीतील ‘माटोळी’च्या बाजारावरील ‘सोपो‘चे संकट टळले असतानाच, आज बाजारावर पावसाचे विघ्न आले.
Bicholim Market
Bicholim MarketDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोलीतील ‘माटोळी’च्या बाजारावरील ‘सोपो‘चे संकट टळले असतानाच, आज बाजारावर पावसाचे विघ्न आले. चतुर्थीच्या पूर्वदिनी आज (मंगळवारी) पावसाने कहर करताना माटोळी विक्रेत्यांसह ग्राहकांची दाणादाण उडवली.

पावसाच्या पाण्याबरोबर काही विक्रेत्यांचे माटोळीचे सामानही वाहून जाण्याचा प्रकार घडला. दरम्यान, पारंपरीक माटोळी विक्रेत्यांकडून आज (मंगळवारी) मात्र पालिकेकडून ‘सोपो’ आकारण्यात आला नाही. त्यामुळे कालच्याप्रमाणे ‘सोपो’ वरुन आज बाजारात गोंधळ झाला नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही डिचोलीत ‘माटोळी’चा बाजार फुलला होता. वेगवेगळ्या भागातील मिळून दोनशेहून अधिक विक्रेते माटोळीचे सामान घेऊन बाजारात विक्रीसाठी बसले होते. मात्र आज (मंगळवारी) पावसाने माटोळीच्या बाजारावर विरजण टाकले.

Bicholim Market
Goa Politics: कामत, तवडकरांना गणेश चतुर्थीनंतरच खाती; मंत्री, नेते गणेशोत्सवात व्यग्र; समर्थकांमध्ये वाढली उत्सुकता

दिवसभर अधूनमधून पर्जन्यवृष्टी सुरूच होती. दुपारी तर जोरदार पाऊस पडल्याने बाजारात ठिकठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे माटोळी विक्रेत्यांवर ''आकांत'' आला. बाजारातही गोंधळ निर्माण झाला.

नगरपालिका इमारतीच्या मागील बाजूने असलेल्या ''मुस्ताफा'' या कपड्यांच्या दुकानासमोरील रस्त्यावर पाणी भरल्याने त्याठिकाणी बसलेल्या काही विक्रेत्यांचे माटोळीचे सामान वाहून जाण्याचा प्रकार घडला.

त्यामुळे या विक्रेत्यांना कपाळावर हात मारण्याची पाळी आली. दरम्यान, सायंकाळी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे विक्रेत्यांची पुन्हा धावपळ झाली. पावसामुळे यंदा माटोळीच्या बाजारावर परिणाम झालाय. असे मत काही विक्रेत्यांनी व्यक्त केले.

पावसामुळे सायंकाळी उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात रानटी फळफुले आदी माटोळीचे सामान बाजारात पडून असल्याचे चित्र दिसून येत होते.

Bicholim Market
Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

‘सोपो’ आकारणी नाही!

पारंपरिक माटोळी विक्रेत्यांकडून ‘सोपो’ आकारण्यात येईल. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत जाहीर केले होते. मात्र सोमवारी सकाळपर्यंत तत्संबंधीचे परिपत्रक पालिकेला मिळाले नव्हते. त्यामुळे काल विक्रेत्यांकडून ''सोपो'' आकारण्यात आला होता.

या मुद्यावरून काल बाजारात गोंधळही निर्माण झाला होता. पालिका प्रशासन खात्याकडून परिपत्रक मिळताच ''सोपो'' आकारणीचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे आज (मंगळवारी) माटोळी विक्रेत्यांकडून ''सोपो'' आकारण्यात आला नाही. त्यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळाला असतानाच, पावसाच्या कहराने त्यांचा आनंद हिरावून घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com