Bicholim News : यंदा शालेय साहित्याच्या दरांत वाढ; छत्र्यांसह इतर साहित्य उपलब्ध

Bicholim News : डिचोली बाजारात आकर्षक रेनकोट, छत्र्यांसह इतर साहित्य उपलब्ध
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, नवीन शैक्षणिक वर्ष जवळ आल्याने सध्या डिचोलीचा बाजार शालेय साहित्याने फुलला आहे. यंदा आकर्षक रेनकोट आणि छत्र्यांसह शालेय साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे.

सध्या बाजारात शालेय साहित्याची खरेदी सुरू झाली असली, तरी पुढील आठवड्यात खरेदीला जोर येणार असल्याची माहिती दुकानदारांनी दिली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाही रेनकोट छत्र्यांसह शालेय साहित्याच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून येत आहे.

शहरातील बागायतदार बाजार या स्वयंसेवी दालनासह ठरावीक साहित्याने सजली आहेत. या दुकानांतून वह्या तसेच अन्य शालेय साहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे.

काही दुकानांमधून रंगीबेरंगी आणि विविध डिझाईनच्या छत्र्या, रेनकोट, बॅग्स आकर्षण ठरत आहेत. कार्टूनचे प्रिंट असलेले रेनकोट आणि बॅग्स तर लहान मुलांना आकर्षित करीत आहेत. बॅग्स, छत्र्या, रेनकोट या वस्तूंमागे किमान १० ते १५ टक्के रुपयांनी वाढ झाली आहे.

Bicholim
Chinese lantern festival In Goa: गोव्यातील चायनीज ग्लोफेस्ट-द लँटर्न फेस्टिव्हलवरुन वाद का होतोय?

यादीनुसार साहित्य खरेदी

शालेय साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या वाढली आहे. तरीदेखील साहित्याला अजूनही मागणी आहे. काही पालक शाळा सुरु होण्याआधीच साहित्य खरेदी करतात. तर काही पालक शाळेतून मिळणाऱ्या यादीनुसार साहित्य खरेदी करतात.

सध्या शालेय साहित्याची खरेदी सुरु झाली असली, तरी शाळा सुरू होण्यास चार-पाच दिवस अगोदर शालेय साहित्य खरेदीला जोर येणार आहे, असे दुकानदार कॅजीटन वाझ यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com