Bicholim News : डिचोलीतील ग्रामीण भागात वीजसमस्येने लोक कंटाळले

Bicholim News : गेल्या जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळापासून उष्णतेने कहर केला आहे. मॉन्सून सक्रिय झाला असला, तरी अजूनही गारवा निर्माण झालेला नाही पाऊस बंद झाला की, उकाडा जाणवत आहे.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोलीत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून, शहरासह ग्रामीण भागातील ग्राहक वीज समस्येने हैराण झाले आहेत. कारापूरसह सर्वण, मये आदी बहुतेक भागांत अधूनमधून रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असून, तासन्‌तास वीज ‘गुल’ होत असते.

गेल्या जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळापासून उष्णतेने कहर केला आहे. मॉन्सून सक्रिय झाला असला, तरी अजूनही गारवा निर्माण झालेला नाही पाऊस बंद झाला की, उकाडा जाणवत आहे. अशावेळी वीजपुरवठा खंडित झाला की, नागरिकांचे पुरते हाल होतात. सर्वणसह मये भागात वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

वीजपुरवठा खंडित झाला, की हॉटेल आदी लहान-सहान व्यावसायिकांना त्याचा प्रचंड फटका बसत आहे. सध्या शाळाही सुरू आहेत. शाळेच्या वेळेत वीज गेली, तर विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही मुश्‍कील होते, अशी तक्रार आहे.

Bicholim
Goa News : ढवळीत कोसळलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी

मॉन्सूनपूर्व कामांवर शंका

पावसाळा जवळ आला की, दरवर्षी वीज खात्यातर्फे वीजतारांच्या संपर्कात असलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे आदी मॉन्सूनपूर्व देखभालीची कामे करण्यात येतात. यंदाही बहुतेक भागात ही कामे करणेत आली. तरीही वरचेवर वीज गुल होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे मॉन्सूनपूर्व कामे व्यवस्थित केली आहेत की नाहीत, त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com