Bicholim News : तुमची स्वप्ने मुलांवर लादू नका : सुलक्षणा सावंत

Sulakshana Sawant डिचोलीत पालक परिषद कार्यशाळा उत्साहात
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली, चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगले शिक्षण महत्त्वाचे असते. आपल्या पाल्यांचे व्यक्तिमत्व घडवताना तो सुखी, समाधानी व निरोगी असेल याची काळजी घ्या.

आपली स्वप्ने त्यांच्यावर लादू नका आणि संकटावर मात करण्याची ताकद त्यांच्यात निर्माण करा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुलक्षणा सावंत यांनी केले.

गोमंतक पालक परिषद व डिचोली तालुका भागशिक्षणाधिकारी कार्यालय (एडीइआय) यांच्या संयुक्त विद्यमाने डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या डिचोली तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्‍घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. यlप्रसंगी गोवा बोर्डाचे माजी अध्यक्ष जे. आर. रिबेलो हे या कार्यशाळेला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

Bicholim
Goa Assagao: आसगाव घर मोडतोड प्रकरणाचा तपास मंदावला; क्राईम ब्रँचचा बचावात्मक पवित्रा

तालुका भागशिक्षणाधिकारी लीना कळंगुटकर सन्माननीय अतिथी म्हणून, तर प्रा. आत्माराम गावकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी परिषदेचे निमंत्रक रामचंद्र गर्दे, सौ. पावसकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.

लीना कळंगुटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंतरच्या सत्रात आत्माराम गावकर, जे. आर. रिबेलो, रामचंद्र गर्दे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com