Lumpy Disease: डिचोलीत जनावरांना 'लम्पी'ची लागण, सिकेरीतील गोशाळेत उपचार सुरू

Bicholim: डिचोली परिसरात गुरांना ‘लम्पी’ या त्वचा रोगाची लागण झाली असून, या रोगाचा प्रादुर्भाव झालेले आणखी एक गोधन शहरात आढळून आले आहे.
Lumpy Disease
Lumpy DiseaseDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोली परिसरात गुरांना ‘लम्पी’ या त्वचा रोगाची लागण झाली असून, या रोगाचा प्रादुर्भाव झालेले आणखी एक गोधन शहरात आढळून आले आहे. ‘लम्पी’ अर्थातच त्वचा रोगाची लागण झालेल्या या बैलाची सिकेरी येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. गोशाळेत या बैलावर उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

गेल्या सहा महिन्यात आतापर्यंत डिचोली शहरात लम्पीग्रस्त दोन गुरे आढळून आली आहेत. यावरून डिचोली परिसरात ‘लम्पी’ रोगाचा फैलाव झाल्याचा अंदाज आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात शहरातील कातरवाडा-आयडीसी येथे एक 'लम्पी' रोगग्रस्त वासरू आढळून आले होते. या वासराची नंतर गोशाळेत रवानगी करण्यात आली.

या वासरावर उपचार केल्यानंतर ते रोगमुक्त होऊन धडधाकट झाले आहे. ''लम्पी'' अर्थातच त्वचा रोग झालेला एक बैल शहरातील मुस्लिमवाडा-आयडीसी भागात संचार करीत असल्याचे आढळून आले होते. या लम्पीग्रस्त बैलासंबंधी माहिती मिळताच, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांनी सिकेरी येथील गोशाळेशी संपर्क साधला.

Lumpy Disease
Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोशाळेचे वाहन मुस्लिमवाडा येथे येऊन रोगग्रस्त बैलाला घेवून गेले. गोशाळेतून मिळालेल्या माहितीनुसार लम्पीग्रस्त या बैलाला अन्य गुरांपासून अलिप्त ठेवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. डिचोली परिसरात ‘लम्पी’ रोगाची लागण झालेली दोन गुरे आढळून आल्याने आणखी रोगग्रस्त गुरे असू शकतात. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लागण कशी होते?

लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव हा प्राण्यांच्या हालचाली, रोगप्रतिकारक स्थिती आणि वारा आणि पावसावर अवलंबून आहे. हा विषाणू रक्त, नाकातील स्लेश्म, अश्रु, वीर्य आणि लाळ याद्वारे एका पशुकडून दुसऱ्या पशुकडे प्रसारित होतो. हा रोग संक्रमित दुधाद्वारे दूध पिणाऱ्या वासरांमध्ये देखील पसरतो.

Lumpy Disease
Goa Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री करणं पडलं महागात, पाजीफोंड येथील 24 वर्षीय युवतीला 3.30 लाखांचा चुना; आरोपी गजाआड

जनावरांची काळजी घ्या!

जनावरांना त्वचा रोग येऊ नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याची गरज आहे. रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये म्हणून पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. रोगाची लक्षणे आढळल्याबरोबर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडूनच जनावराची तपासणी करून घ्यावी.

गोठ्यात गायी व म्हशींना एकत्रित बांधू नये. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. रोगाचा प्रसार किटकामार्फत होत असल्यामुळे किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. परिसरात स्वच्छता राखावी व निर्जंतुक द्रावणाने परिसरात फवारणी करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com