Bicholim Accident : अपघातात जखमी युवकाचे अखेर निधन

Bicholim Accident : २० दिवसांत ४ बळी : अपघातांत वाढ
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim Accident :

डिचोली, येथील रस्ता अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या २० दिवसांत डिचोली पोलिस हद्दीतील वेगवेगळ्या रस्त्यांवर झालेल्या अपघातांत तीन युवकांसह चारजणांचे बळी गेले आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नानोडे येथे झालेल्या अपघातातील गंभीर जखमी युवकाचे अखेर उपचारादरम्यान निधन झाले.

गेल्या सोमवारी रात्री अस्नोडे-कासारपाल रस्त्यावरील नानोडे येथे कारगाडी आणि मोटारसायकल अपघातात महिलेसह तिघेजण जखमी झाले होते. यापैकी गंभीर जखमी झालेल्या लाखेरे,डिचोली येथील संदेश गवळी याच्यावर गोमेकॉत उपचार सुरु होते. मात्र काल सकाळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

Bicholim
Goa's Daily News Wrap: गोव्यातील क्राईम, राजकारण, पर्यटन, क्रीडा क्षेत्रातील ठळक घडमोडींचा आढावा

अपघात आणि बळी

गेल्या २३ मार्च रोजी साखळी येथे मोटारगाडीने ठोकरल्याने मडकई, फोंडा येथील संदेश नाईक हा मोटारसायकलस्वार ठार झाला होता.

गेल्या ३ एप्रिल रोजी नानोडे मुळगाव रस्त्यावर बॅरियरला धडक बसल्याने झालेल्या अपघातात अस्नोडा येथील शुभम बाणावलीकर या युवकाचा बळी गेला.

गेल्या रविवारी पैरा-शिरगाव येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पैरा येथील पुष्पराज हळदणकर हा युवक गतप्राण झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com