Bethora Firing Case: बेतोडा गोळीबार प्रकरण; फोंड्यातील एक, बिहारच्या दोघांना अटक

Bethora Firing Case: गोळीबारानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते.
Three Accused arrested in Bethora Firing Case
Three Accused arrested in Bethora Firing CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Bethora Firing Case

बेतोडा येथे शुक्रवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास झालेल्या गोळीबारात सचिन कुर्टीकर (32) जखमी झाला होता. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

यापैकी एकजण फोंडा येथील रहिवासी असून, दोनजण मूळ बिहारचे रहिवासी आहेत. गोळीबारानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते.

फोंडा पोलिसांनी संशयित आरोपी देवदास राधाकृष्ण मसुरकर (47), प्रविण कुमार प्राजू पासवान (22) आणि प्रभात प्राजू पासवान (25) (दोघेही रा. बेतोडा, फोंडा मूळ बिहार) यांना फोंडा पोलिसांकडून अटक. दोघेही बेतोडा येथे भाड्याच्या जागेत राहत होते.

शुक्रवारी गोळीबाराची घटना उडकीस आल्यानंतर सचिनची आई आणि बहीण यांच्याकडून फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावरुन पोलिसांनी कलम 307, 120-B आणि आर्म अॅक्टच्या 3,25 & 27 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Three Accused arrested in Bethora Firing Case
Margao News : कसली नारी शक्‍ती वंदना? आधी महिलांच्‍या सुरक्षेची ‘गॅरंटी’ द्या! बीना नाईक

जखमी सचिन शुक्रवारी पहाटे कामावर जात असताना दुचाकीवरुन आलेल्या संशयितांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरुन फरार झाले. झाडलेली गोळी सचिन यांच्या काखेतून निसटून दुचाकीच्या स्पीडोमीटरमध्ये अडकली.

स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले आणि सचिन यांना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून गोमेकॉत दाखल करण्यात आले.

या प्रकरणात अमली पदार्थासह अनैतिक संबधाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी देखील या घटनेत नातेसंबधातील वादाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com