Margao News : कसली नारी शक्‍ती वंदना? आधी महिलांच्‍या सुरक्षेची ‘गॅरंटी’ द्या! बीना नाईक

Margao News : दक्षिणेत महिलेला उमेदवारीची घोषणा एक जुमलाच
Bina Naik
Bina Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

Margao News :

मडगाव, देशात महिला मतदारांची संख्‍या पुरुषांपेक्षा जास्‍त आहे, याची जाणीव असल्‍यामुळेच या महिलांची मते मिळविण्‍यासाठी भाजपने ‘नारी शक्‍ती वंदना अभियान’ सुरू केले आहे.

प्रत्‍यक्षात हे अभियान म्‍हणजे भाजपचा निवडणुकीचा आणखी एक जुमला आहे, हे कुणी सांगण्‍याची गरज नाही. सध्‍या पंतप्रधान नरेंद्र माेदी लोकांना गॅरंटी देत सुटले आहेत. त्‍यांनी सर्वांत आधी महिलांच्‍या सुरक्षेची गॅरंटी द्यावी, असे आव्‍हान गोवा प्रदेश महिला काँग्रेस समितीच्‍या अध्‍यक्ष बीना नाईक यांनी दिले.

जागतिक महिला दिनाच्‍या पूर्वसंध्‍येला ‘गोमन्‍तक टीव्‍ही’ने आपल्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बीना नाईक यांची मुलाखत घेतली. यावेळी देशाप्रमाणेच गोव्‍यातही महिला सुरक्षित नाहीत. देशात प्रत्‍येक पाचव्‍या तासाला एका महिलेवर बलात्‍कार होतो.

गोव्‍यात दर तिसऱ्या दिवशी एक महिला लैंगिक अत्‍याचाराची बळी ठरते. अशा परिस्‍थितीत महिला सुरक्षित आहेत, हे मानायचे तरी कसे, असा सवाल त्‍यांनी केला.

सध्‍या दक्षिण गोव्‍यात भाजपने महिला उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देणार, अशी जी घोषणा केली आहे तीही एक जुमलाच, असा आरोप बीना नाईक यांनी केला.

त्‍या म्‍हणाल्‍या, जर महिलेला उमेदवारी द्यायची असती तर भाजपने आपला निर्णय आधीच का जाहीर केला नाही. सध्‍या भाजपमध्येच या उमेदवारीवरून गोंधळाचे वातावरण आहे.

गाव पातळीवर केली आंदोलने

गोव्‍यात महिलांवर होणाऱ्या अन्‍यायाच्‍या विरोधात महिला काँग्रेस रस्‍त्‍यावर का येत नाहीत, असे बीना नाईक यांना विचारले असता, महागाईच्‍या प्रश्‍नावर आम्‍ही लोकांचे लक्ष वेधण्‍यासाठी अगदी गाव पातळीवर जाऊन आंदोलन केले.

मात्र, हे कार्यक्रम गाव पातळीवर झाले असल्‍याने कदाचित त्‍याला योग्‍य त्‍या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली नसेल. मात्र, समस्‍या सोडविण्‍यासाठी प्रत्‍येकवेळी रस्‍त्‍यावरच यायला पाहिजे असेही नाही. इतर माध्‍यमांतूनही या समस्‍यांवर लक्ष वेधले जाऊ शकते, असे अनेक उपाय यासाठी आम्‍ही घेतले आहेत, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com