Benaulim ZP By-Election : चौघांचे भवितव्य २०,१२९ मतदारांच्या हाती; उद्या होणार मतदान

Benaulim ZP By-Election बाणावली जिल्हा पंचायत निवडणूक
Voting
VotingDainiK Gomantak

Benaulim ZP By-Election :

सासष्टी, बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूकीतील मतदान रविवार २३ जून रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत होणार असून या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या चार उमेदवारांचे भवितव्य २०,१२९ मतदारांच्या हातात आहे.

या निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी तर्फे ‘आप’च्या जॉसेफ पिमेंताला उमेदवारी दिली असून रॉयला फर्नांडिस, ग्रेयफन्स फर्नांडिस, फ्रॅंक फर्नांडिस या इतर तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

या वेळी एकही मतदान केंद्र असंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. या मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून उद्या कर्मचारी मतदानाची सामुग्री घेऊन आपल्या मतदान केंद्रावर रवाना होतील.

Voting
Goa Top News: उसगावात दोन अपघात, पर्वरी उड्डाणपूल, कुळे येथील आग; गोव्यातील ठळक बातम्या

सोमवारी मतमोजणी :

मतमोजणी माथानी साल्ढाना जिल्हा प्रशासन इमारतीच्या तळमजल्यावर सोमवार, २४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल.बाणावलीच्या निवडणुकीत २७ मतदान केंद्रे स्थापण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर ५ असे एकूण १३५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. शिवाय पोलिस खात्यातर्फे पोलिसही तैनात केले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com