Bastoda: बस्तोडा हल्लाप्रकरणी तपास अधिकारी बदला! कार्लोस यांची मागणी; सूत्रधार भाजप कार्यकर्ता असल्याचा केला दावा

Goa Congress: काँग्रेस भवनात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत फेरेरा म्हणाले की, या हल्ल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक करून हे प्रकरण थंडावण्याचा प्रयत्न केला आहे.
Amit Patkar, Carlos Ferreira
Amit Patkar, Carlos FerreiraDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बस्तोडा येथे रोडरेजवरून शिरोडकर दांपत्यावर झालेल्या अमानुष हल्लाप्रकरणातील तपास अधिकारी उपनिरीक्षक बाबलो परब याचा संशयितांशी लागेबांधे असल्याने त्याच्याकडील तपासकाम काढून घेण्यात यावे व त्याची चौकशी करावी.

या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार भाजपचा कार्यकर्ता असल्याने कारवाईत चालढकलपणा सुरू आहे. भाजपचा पाठिंबा असलेल्या कार्यकर्त्यांनी राज्यात गुंडगिरी चालवली आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी केला.

येथील काँग्रेस भवनात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत फेरेरा म्हणाले की, या हल्ल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक करून हे प्रकरण थंडावण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र मुख्य सूत्रधाराला अटक करण्याकडे प्रयत्न केले जात नाही. काही दिवसांपूर्वी म्हापशात झालेल्या भाजप मेळाव्यात तुळशीदास शेट्ये हा सभेतील दुसऱ्या रांगेत बसलेला होता. त्यामुळे पक्षाचे पाठबळ आहे, असे गृहित या कार्यकर्त्याने दहशत माजवली आहे.

भाजपच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. पोलिस स्थानकात सुरू असलेल्या तपासकामाची माहिती उपनिरीक्षक बाबलो परब हा गायब असलेल्या संशयितांपर्यंत माहिती पोचवत असल्याचा संशय शिरोडकर कुटुंबीयांना आहे. या हल्ल्यात समावेश असलेल्या तुळशीदास, कार्तिक व रुत्विक यांची नावे पीडित कुटुंबियाने दिली आहेत.

परब याला संशयिताशी बातचीत करतानाही पाहण्यात आले आहे. त्यामुळे तो तपासकामात हस्तक्षेप करत असल्याने पोलिस अधीक्षकांनी तपासकाम अधिकारी बदलावा. तो कोणाच्या दडपणाखाली काम करत होता हे त्याच्या मोबाईलची ‘सीडीआर’ मागवून घेतल्यास सर्व काही उघड होईल. या घटनेला तीन दिवस उलटले असले तरी भाजप प्रदेशाध्यक्ष कोणती कारवाई करणार तसेच मुख्यमंत्र्यानी संशयिताला अटक केली जाईल असे सांगून अधिक भाष्य न करता गप्प आहे असे ते म्हणाले.

Amit Patkar, Carlos Ferreira
Mapusa Crime: गरोदर महिलेसह पतीला 'रोडरेज'वरून मारहाण, 20 जणांवर गुन्‍हा; बस्‍तोड्यातील प्रकार

कायद्याच्या वर कोणीच नाही, टिकलो

म्हापसा : बस्तोडा येथे गरोदर महिला व त्यांच्या पतीवर जो हल्ला झाला, तो दुर्दैवी व घृणास्पद आहे. या हल्ल्यामागे सहभागी असलेल्यांवर पोलिसी कारवाई सुरू आहे. कायद्याच्या वर कोणीही नाही. त्यामुळे संशयित कुठल्याही पक्ष किंवा ती व्यक्ती राजकारणी असली तरीही त्याच्यावर कारवाई होईल, असे हळदोणेचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी सांगितले.

Amit Patkar, Carlos Ferreira
Bastora Drowning Case: बस्तोडा पुलाजवळ आढळला अज्ञात मृतदेह; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू

भाजप कारवाई करणार?

राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाही. बलात्कार, खून व अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. एका गरोदर तरुणीला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. भाजपचे पदाधिकारी यात सामील आहेत, त्यामुळे हा पक्ष अशा गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्‍न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com