Illegal Constructions : करासवाडा परिसरात बेकायदा बांधकामात वाढ

Illegal Constructions In Road : रस्त्यावर अतिक्रमण : म्हापसा पालिका, सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे नाराजी
Illegal Constructions
Illegal Constructions Dainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश, करासवाडा चाररस्ता परिसरात वाढती बेकायदा बांधकामे तसेच रस्त्यांवर झालेले अतिक्रमण वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे.

त्यामुळे अपघातही वाढले आहेत. म्हापसा पालिका तसेच अन्य सरकारी यंत्रणांनीही याकडे दुर्लक्ष चालविल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

कारासवाडा येथील चार रस्ता जंक्शनवरून रोज हजारो वाहने प्रवास करतात. यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. परंतु या जंक्शनला जोडणाऱ्या चारही रस्त्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारून रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता अपुरा पडत आहे. याचा परिणाम वारंवार येथे अपघात होत असून आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महामार्गाच्या उड्डाणं पुलाला जोडून असलेल्या दोन्ही सर्व्हिस रोड शेजारी अनेक मटण चिकन सेंटर, फळविक्रेते आदी अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. यापैकी अनेकांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. मात्र या अतिक्रमणाकडे पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे, यामुळे नागरिक संताप व्यक्त

करतात.

आमदाराने लक्ष द्यावे : बर्डे

म्हापसा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी येथील बेकायदा बांधकामाबाबत तसेच पालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. आंधळं दळतंय आणि कुत्रं खातंय, असा येथील प्रकार आहे.

बेकायदा बांधकामे तसेच अतिक्रमणे वाढण्यामागे स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे. याकडे स्थानिक नगरसेवक, पालिका तसेच सरकारी अन्य यंत्रणेही दुर्लक्ष केले आहे. येथील आमदाराने तरी याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

Illegal Constructions
B 32 Muthal 44 vare : ब्रा साईज पाहणाऱ्यांच्या कानाखाली वाजवणारा विद्रोही मल्याळम चित्रपट माहितेय का?...

पालिका अतिक्रमण हटविणार : हरमलकर

या भागाचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर यांनी सांगितले की, सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या बेकायदा दुकानमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच पालिकेने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. येथील दोन्ही सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील अतिक्रमणे हटवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com