Balrath Employees Strike: मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे नाही ; बालरथ कर्मचारी आक्रमक

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
Balrath Employees Strike
Balrath Employees StrikeDainik Gomantak
Published on
Updated on

Balrath Employees Strike: युनायटेड बालरथ कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून आझाद मैदान येथे संप सुरू केला आहे. जोपर्यंत शासन आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाही.

आम्हाला सरकारद्वारे योग्य वेतन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचा इशारा बालरथ कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला.

संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर म्हणाल्या, बालरथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सकाळी भेट घेतली असता त्यांनी आमच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली तसेच बालरथ चालकाला १२ हजार तर साहाय्यकाला ६ हजार मासिक वेतन देण्याचे मान्य केले;

परंतु आम्ही कर्मचाऱ्यांशी बोलून यावर संप मागे घ्यायचा की नाही ते ठरवू.सर्व कर्मचाऱ्यांना सरकारने केलेली वाढ मान्य नसून बुधवारी (ता.१९) यावर चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल.

२००३ साली बालरथ योजनेची सुरवात करण्यात आली. ज्यात शाळेलगतच्या ३ किमी परिसरातील मुलांना शाळेत आणण्यासाठी या बसचा वापर केला जायचा.

परंतु खासगी शाळा व्यवस्थापनांनी ३ किमीबाहेरच्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी या बसचा वापर केल्याने याचा परिणाम होऊन राज्यातील सरकारी शाळांमध्ये घट झाली.

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या घटात बालरथ योजना एक महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ते विधानसभेत लक्षवेधी सूचनेदरम्यान बोलत होते.

Balrath Employees Strike
Goa Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, इंधनाच्या दरात बदल; जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव

विम्याचीही सोय करणार

शिक्षण संचालकांनी आझाद मैदानावर जाऊन बालरथ कर्मचाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना शैलेश झिंगडे म्हणाले, आम्ही बालरथ कर्मचाऱ्यांना अर्धवेळ कामगार म्हणून घेतले होते.

परंतु असे निदर्शनास आले आहे की अनेक शाळा व्यवस्थापने त्यांना इतरही कामे करायला लावतात तसेच त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. परंतु आता त्यांच्‍या वेतनात सुधारणा करून वेतनासहित त्यांच्या विम्याची सोय करण्यात येणार आहे.

पगारवाढीची मागणी

दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली असून बालरथ चालकाला १२ हजार तसेच सहकाऱ्याला ६ हजार रुपये पगार देण्यात येईल.

दर महिन्याला त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील तसेच पगारात दरवर्षी ३ टक्के वाढ केली जाईल. तसेच ऑक्टोबरनंतर १२ महिन्यांचे वेतन देण्यात येईल. परंतु विरोधकांनी बालरथ चालकांचा २० तर साहाय्यकांना १४ हजार रुपये वेतन करण्याची मागणी केली आहे..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com