धारगळ आयुष हॉस्पिटल म्हणजे आरोग्याची समस्या

पंचायतीने (Panchayat) आपला पवित्र बदलला असून जर घाणीवर नियंत्रण मिळाले नाही तर थेट न्यायालयात (court) जावून हे हॉस्पिटल (Hospital) बंद करण्याचा इशारा दिला.
उघड्यावर कचरा
उघड्यावर कचरा Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: धारगळ येथे पहिल्या टप्प्यातील आयुष हॉस्पिटलची उभारणी केंद्र सरकारच्या 500 कोटी रुपये खर्च करून इमारत उभारण्याचे काम सुरु आहे, हि इमारत आणि तेथील परिसर पाहिल्यास जनतेच्या आरोग्याची (health) काळजी घेण्याऐवजी आरोग्याच्या समस्या निर्माण करणारी ठरत आहे.

400 मजुरांसाठी केवळ 10 शौचालय, अनेक महिला पुरुष उघड्यावरच नैसर्गिक विधी करत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, ठीक ठिकाणी गार्बेज आणि सांड पाणी त्यामुळे मलेरिया डेंगू सारख्या रोगाना आमंत्रण मिळत आहे. धारगळ पंचायतीने गार्बेज आणि परिसरातील सांडपाणी या विषयी लेखी नोटीस पाठवूनही ठेकेदाराने त्या नोटीसीला (Notice) कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे.

आता पंचायतीने (Panchayat) आपला पवित्र बदलला असून जर नियंत्रण मिळाले नाही तर थेट न्यायालयात (Court) जावून हे हॉस्पिटल बंद करण्याचा इशारा 3 रोजी सरपंच भूषण नाईक, पंच प्रदीप पटेकर, पंच वल्लभ वराडकर व पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी भेट देवून परिसराची पाहणी केली त्यावेळी इशारा देण्यात आला .

उघड्यावर कचरा
टेम्बवाडा मोरजी येथे पाण्याची गंभीर समस्या सुटली;पाहा व्हिडिओ

सर्वमंगला बिल्डर्स या कंपनीला हे हॉस्पिटल इमारत बांधण्यासाठी ठेका मिळाला आहे. या कामासाठी बिगर गोमंतकीय(Gomantakiya) एकूण 400 पेक्षा जास्त मजूर पत्राच्या खोपीत वास्तव्य करून राहतात. या 400 पेक्षा जास्त मजुराना केवळ 10 सौचालायाची कंपनीने सोय केली आहे, 100 व्यक्तीला 1 शौचालय केवळ एक मिटीत नैसर्गिक (Natural) विधी करायला दिला तर 100 मिनिटे हवीत मग हे मजूर पहाटे कधी उठत असतील आणि या सौचालयाचा वापर केला तर त्याच्या रांगा लागतील शिवाय त्याचे कुटुंबीय आहे. या परिसरातील मजूर अनेक जण मोकळ्या जागेत नैसर्गिक विधी करायला जात असतात, परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली.

ठीक ठिकाणी गार्बेज आणि घाणीचे पाणी पसरलेले आहे, आरोग्य अधिकाऱ्यांना आणून पंचायतीने पाहणी करायला लावली त्यावेळी अधिकाऱ्यांनी सर्वत्र परिसराची पाहणी करून कंपनीला नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले.

उघड्यावर कचरा
मोरजी टेंबवाडामधील पाण्याच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच!

हॉस्पिटल कि आणखी काय ?

धारगळ सरपंच भूषण नाईक यांनी यावेळी परिसराची पाहणी करून स्थानिक पत्रकांरांकडे बोलताना या ठिकाणी नक्की कसला प्रकल्प उभारला जात आहे आहे साधी फाईल पंचायतीला आली नाही, नक्की कसला व कश्या पद्धतीचा प्रकल्प उभारला जात आहे, या विषयी पंचायतीला काहीच कल्पना नाही. याठिकाणी स्थानिकाना रोजगार नाही. रोगराई पसरवण्याचे काम हि कंपनी करत आहे, दोन दिवसात काम बंद केले नाही तर कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा सरपंच भूषण नाईक यांनी दिला आहे, न्यायालयात हे प्रकरण पोचवणार असल्याचे सांगितले.

पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावास यांनी बोलताना स्थानिक आमदार (MLA) तथा उपमुख्यमंत्री (Deputy CM) बाबू आजगावकर, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावट यांच्याकडे या पूर्वीच चर्चा केली आहे. कंत्राट दार मनमानी पद्धतीने काम करत आहे, आता त्याच्या विरोधात धारगळ पंचायतीने उठाव केला आहे. त्वरित कंपनीने ज्या पंचायतीने मागण्या केल्या त्या पूर्ण कराव्यात अन्यथा पुढील कारवाईस कंत्राटदाराने समोर जावे असे सांगितले.

पंच प्रदीप पटेकर यांनी बोलताना कंपनीकडे 400 मजूर आहेत आणि 10 शौचालय आहे. प्रत्येकजण या शौचालयाचा वापर करत असेल तर किती तास त्या मजुरांचे वाया जातील आणि ते कामगार वेळेवर पोचतील का आपल्या कामावर असा सवाल करून अनेक मजूर स्त्रिया उघड्यावर शौचालय करून दुर्गंधीमय वातावरण तयार करून आरोग्याच्या समस्या निर्माण करत आहे, या कडे आरोग्य खात्याचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पटेकर यांनी केला.

उघड्यावर कचरा
मोरजी दुर्गा उत्सवात दांडिया गरबा नृत्य सादर करताना;पाहा व्हिडिओ

मलेरियाचे रुग्ण सापडले

या इमारतीचे काम करतात त्या मजुराना जून महिन्यात पाच जणाना मलेरियाची लागण झाली होती, त्यातील काही रुग्ण दगावल्याचा दावा पंचायतीने करून योग्य ती माहिर्ती पंचायतीला दिली जात नाही असे पंचायतीने सांगितले.

पंचायतीकडे नोंदच नाही.

हॉस्पिटल इमारत उभारण्यासाठी जे बिगर गोमंतकिय मजूर वास्तव्य करून आहेत त्याची साधी माहिती धारगळ पंचायतीकडे नसल्याची माहिती भूषण नाईक यांनी दिली.

स्थानिक नागरिक घाण काढतो ?

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे आपल्या भाषणात म्हणत असतात पेडणे मतदार संघात जे जे प्रकल्प येत आहेत आणि चालू आहे त्यातून रोजगार आणि काम उद्योग स्थानिकांनाच मिळणार अशी ग्वाही देतात. मात्र या प्रकल्पात स्थानिक एक नागरिक कामाला आहे, त्या कामगाराला परिसरातील घाण साफ करण्याचे काम दिले आहे. इमारत बाधकाम, प्लंबिंग, फर्निचर हे काम करण्यासाठी स्थानिकाना या प्रकल्पात संधी नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com