Goa News: अमानवी! पोलिस बंदोबस्त तैनात करुन पत्नीवर अंत्यविधी करण्यापासून रोखले; ‘मानवाधिकार’ची पोलिस अधीक्षकाला नोटीस

Avedem Quepem Crime News: तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २५ फेब्रुवारी रोजी गावस देसाई यांच्या पत्नीचे निधन झाले. कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने वडिलोपार्जित जागेवर अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला.
Avedem Quepem Crime News
Human RightsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आवेडे, केपे येथील ज्येष्ठ नागरिक गणेश राघोबा गावस देसाई (८६) यांनी केलेल्या तक्रारीवर गोवा मानवाधिकार आयोगाने दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. आयोगासमोर हजर राहून उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गणेश गावस देसाई यांनी ३ मार्च रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी पोलिसांनी विनाकारण हस्तक्षेप करून कुटुंबाला धार्मिक विधी पार पाडण्यास मज्जाव केला. त्यांनी पोलिसांवर काही राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप केला आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २५ फेब्रुवारी रोजी गावस देसाई यांच्या पत्नीचे निधन झाले. कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने वडिलोपार्जित जागेवर अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. मात्र, त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करून पोलिसांनी कुटुंबाला अंत्यविधी करण्यापासून रोखले.

Avedem Quepem Crime News
Crime News: शेंगदाणे, पापडात लपवले चरस; कुरिअरद्वारे गोव्याला अमली पदार्थ पाठवण्याचा कट पोलिसांनी उधळला

मानवाधिकार आयोगाचे कार्यवाह अध्यक्ष डेस्मंड डिसोझा आणि सदस्य प्रमोद कामत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षकांना २ एप्रिलला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Avedem Quepem Crime News
Cyber Crime: 'वर्क फ्रॉम होम'चा धोका! महिलेला 4.35 लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा

सांगोडकर यांनी बळजबरी केली!

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, केपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांनी कोणतेही न्यायालयीन आदेश नसताना कुटुंबावर बळजबरी केली. तसेच, प्रल्हाद देसाई, उल्हास देसाई, विशाल देसाई आणि राजेश देसाई यांच्यासह काही राजकीय व्यक्तींनी पोलिसांचा गैरवापर करून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीत हस्तक्षेप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com