Jeet Arolkar : ‘अटल आसरा’तून गरिबांना आधार

केंद्र आणि राज्य सरकारची प्रत्येक योजना ही गरिबांच्या हितासाठीच असते
Jit Arolkar
Jit ArolkarGomantak Digital Team

Jeet Arolkar on Atal Asara: केंद्र आणि राज्य सरकारची प्रत्येक योजना ही गरिबांच्या हितासाठीच असते. त्यातील एक योजना म्हणजे अटल आसरा ही योजना चांगली असून, या योजनेतून गरिबांना आधार मिळेल, असे प्रतिपादन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केले.

मांद्रे मतदारसंघातील एकूण 44 गरजूंना घर दुरुस्तीसाठी अटल आसरा योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांच्या अनुदान निधीचे मंजुरीपत्र वितरित केल्यानंतर ते बोलत होते.

आरोलकर म्हणाले, की या योजनेतून मंजूर झालेल्या निधीपैकी आठ दिवसांत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण 75 हजार रुपये जमा होणार आहेत .

Jit Arolkar
Hanuman Jayanti 2023: पूजेत 'या' 4 खास गोष्टींचा करावा समावेश, अन्यथा बजरंगबलीची पूजा राहिल अपूर्ण

त्यातून लाभार्थी आपली घरे पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करू शकतात. निम्मे काम झाल्यानंतर उरलेले 75 हजार जमा होतील. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार गरिबांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे.

परंतु त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अधिकाऱ्यांबरोबरच सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी यांचेही आहे.

ज्या नागरिकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी मांद्रे येथील आपल्या कार्यालयात किंवा तुये येथील डीजी सेवा केंद्रात संपर्क साधावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com