October heat: गोव्यात ऑक्टोबर हिटचा कहर! गोमंतकीय 'हैराण'; अंगाची होतेय लाही-लाही

परतीचा पाऊस अजूनही काही ठिकाणी आपले अस्तित्व दाखवत आहे. परंतु राज्यात कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांवर पोहोचला आहे.
October Hits: गोव्यात ऑक्टोबर हिटचा कहर! गोमंतकीय नागरिक 'हैराण'; अंगाची होतेय लाही-लाही
Goa October heat UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

परतीचा पाऊस अजूनही काही ठिकाणी आपले अस्तित्व दाखवत आहे. परंतु राज्यात कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांवर पोहोचला आहे. वाढलेल्या उष्म्याने ऑक्टोबर हिट जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी १२ नंतर मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे.

गोवा वेधशाळेने पुढील चार राज्यात ग्रीन अलर्ट जारी केल्याने काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कमाल ३३ अंश सेल्सिअस तर किमान २४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

October Hits: गोव्यात ऑक्टोबर हिटचा कहर! गोमंतकीय नागरिक 'हैराण'; अंगाची होतेय लाही-लाही
Goa News: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी शिवोलीत नायजेरियन विद्यार्थ्याला अटक; गोव्यातील ठळक बातम्या

राज्यात तब्बल ९७ एवढ्या आर्द्रतेची नोंद करण्यात आली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत १० टक्के अधिक आहे. राज्यात सांगे, वाळपई आणि साखळीत तुरळक पावसाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com