Arpora Accident: हडफड्यात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, महिला गंभीर, चालक मात्र फरार

Goa Fatal Accident: यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पादचारी महिला गंभीर जखमी झाली आहे
Arpora Road Accident Death
Arpora Road Accident Death Dainik Gomantak
Published on
Updated on

हडफडे: राज्यात सध्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रविवारी (२६ जानेवारी) सकाळी उत्तर गोव्यातील हडफडे या गावात एक भयंकर अपघाताची नोंद झाली. या घटनेत वेगवान गाडी एका दुचाकीला धडकली आणि त्यानंतर विजेच्या खांबाला धडकण्यापूर्वी पादचारी महिलेला याच गाडीने धडक दिली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पादचारी महिला गंभीर जखमी झाली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी चालकाने घटनास्थळाहून पळ काढलाय.

माध्यमांना मिलेल्या माहितीनुसार मयत व्यक्तीचे नाव अम्रुइल्होक असे असून तो मूळचा कलकत्याचा होता. त्याचा मांस विक्रीचा व्यवसाय होता. मयत व्यक्तीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार अम्रुइल्होक हा साळगाव येथून हडफड्यात मांसविक्री करायला जात असतानाच त्याचा दुर्दैवी अपघात झाला. या ठिकाणी सध्या अनेक अपघातांची नोंद होतेय.

Arpora Road Accident Death
Goa Accident: 14 वर्षांच्या सायकलस्वार मुलाचा अपघातात मृत्यू; उतारावर नियंत्रण सुटले अन् अनर्थ घडला

जागोजागी गाड्या पार्क केल्याने वाहतुकीवर परिणाम होतोय आणि म्हणूनच आमदार तसेच पंचायतीने यावर ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी स्थानिक करतायत. या वेगवान गाडीने अचानक दिलेल्या धडकेत एक बाई गंभीर जखमी झाली आहे, गाडीने दिलेल्या धडकेमुळे ती ओढत पुढे गेली आणि समोर असलेल्या खांब्याला आपटली असे स्थानिक म्हणालेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वाहनचालक दारूच्या नशेत असणायची शक्यता आहे.

फोटो काढणं सोडून मदत करा!

हा अपघात सकाळी ७-७:४५च्या वेळी घडल्याची शक्यता आहे. हडफड्याचे सरपंच रोशन रेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र दुर्दैवाने कोण्ही त्या बाईची मदत करत नव्हतं, याउलट सगळेजणं फोटो काढण्यात व्यस्त होते. सरपंचांनी नागरिकांच्या या कृत्यावर खेद व्यक्त केला आहे.

अपघाताबद्दल बोलताना ते म्हणाले की मडगावमधून ही चारचाकी हडफड्यात आल्याची शक्यता आहे, मात्र बाईला अशा तडफडण्याऱ्या अवस्थेत सोडून गेलेल्या वाहन चालकाला वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतले पाहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com