Goa Chandigarh Flight: सॅल्यूट! विमानाने गोव्यातून चंदीगडला जाणाऱ्या प्रवाशाचे आर्मी जवानाने वाचवले प्राण

Goa Chandigarh Flight: प्रवाशाची प्रकृती लक्षात घेता मेजर सिमरत राजदीप सिंग यांनी वैमानिकाला फ्लाईटचे मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी विनंती केली.
Goa Chandigarh Flight
Goa Chandigarh Flight

Goa Chandigarh Flight

गोव्यातून चंदीगडला जाणाऱ्या फ्लाइटमधून गंभीर आजारी असणाऱ्या 27 वर्षीय प्रवाशाचे प्राण भारतीय लष्करातील डॉक्टरने वाचवले आहे. मेजर सिमरत राजदीप सिंग असे या डॉक्टरचे नाव असून ते वेस्टर्न कमांड हॉस्पिटल, चंडीमंदिर येथे तैनात आहेत.

मेजर सिमरत यांनी प्रसंगावधान दाखवत तरुणाचे प्राण वाचवले आणि फ्लाईटचे मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग केले.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून चंदीगडला जाणाऱ्या फ्लाईटने सायंकाळी 5:45 वाजता उड्डाण केल्यानंतर 27 वर्षीय प्रवाशाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला.

प्रवाशाने अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार करताच विमानात वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रवास करत असलेले मेजर सिमरत राजदीप सिंग त्याठिकाणी दाखल झाले व त्यांना त्याला आवश्यक प्रथमोपचार दिले. यानंतर प्रवाशाची प्रकृती व्यवस्थित झाली.

Goa Chandigarh Flight
Jumping Chicken: कारवारमधून गोव्यात 'जंपिंग चिकन'ची तस्करी, 42 बेडकांना जीवदान

प्रवाशाची प्रकृती लक्षात घेता मेजर सिमरत राजदीप सिंग यांनी वैमानिकाला फ्लाईटचे मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार रात्री वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोललर सोबत संपर्क साधून मुंबईत फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग केले. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास फ्लाईटने चंदीगडसाठी उड्डाण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com