Leopard Attack: व्हरांड्यात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याची झडप; मध्यरात्रीचा थरार सीसीटीव्हीत कैद

Leopard Attack In Goa: रात्री घराच्या व्हरांड्यात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने झडप घालून त्याला मानेला धरून उचलून नेण्याचा प्रयत्न केला असता, घरातील लोक जागे झाल्याने कुत्र्याला तिथेच टाकून बिबट्याने धूम ठोकली.
Goa Leopard Attack
Leopard AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Leopard Attack

हरमल: रात्री घराच्या व्हरांड्यात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने झडप घालून त्याला मानेला धरून उचलून नेण्याचा प्रयत्न केला असता, घरातील लोक जागे झाल्याने कुत्र्याला तिथेच टाकून बिबट्याने धूम ठोकली. हा सारा प्रकार घरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

२२ रोजी रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याबाजूला सागर नानोस्कर यांचे घर आहे. घराच्या व्हरांड्यात बिबट्याने प्रवेश केला व कुत्र्याला झडप घालून पकडले. कुत्र्याची ओरड ऐकून नानोसकर कुटुंब जागे झाल्याने बिबट्याने पळ काढली.

Goa Leopard Attack
Goa Tourism: सरकारचा अहवाल खोटा? गोव्यात 50 टक्के पर्यटक कमी झाल्याचा शॅकमालकांचा दावा

पकडण्यासाठी पिंजरा लावणार

याबाबत सागर नानोस्कर यांनी वन विभागाला कळवले असून अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे नानोस्कर यांना सांगितले. कोरकणवाडा, पाण्याची टाकी, वरचावाडा, देऊळवाडा आदी भागात या बिबट्याचा संचार असून आतापर्यंत त्याने तीन कुत्र्यांचा फडशा पाडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com