Goa School: शाळांच्या उपहारगृहांत बाजरीचे पदार्थ ठेवा कृषी खात्याचे आवाहन

Goa School: ‘मिलेट ईयर’च्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण संचालनालयाला आवाहन
Goa Millet Farming
Goa Millet FarmingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa School: आरोग्यदायी खाद्य पदार्थांचा आहारात समावेश असावा आणि त्यांची सवय लागावी यासाठी कृषी संचालनालयाने पावले उचलली आहेत. त्यासाठी स्थानिक शेतीला पाठिंबा देण्याबरोबर शिक्षण आणि उच्च शिक्षण संचालनालयाला राज्यातील शालेय उपहारगृहांमध्ये बाजरी (रागी)-आधारित खाद्यपदार्थांचा समावेश करावा, असे आवाहन कृषी खात्याने केलेले आहे.

Goa Millet Farming
Goa Culture: कुंभारजुवेतील सांगडोत्सवात ‘टीम-45’ पथकाची बाजी

केंद्र सरकारने हे वर्ष बाजरीचे आंतरराष्ट्रीय म्हणून जाहीर केले आहे, त्यामुळे या उपक्रमाला अधिक महत्त्व आहे. कृषी संचालक नेव्हील अल्फान्सो यांनी सांगितले की, या उपक्रमात आठवड्यातून किमान एक दिवस बाजरी दिवस म्हणून साजरा केला करण्यात येणार आहे.

बाजरी उत्पादनवाढीसाठी खाते कटिबद्ध

बाजरी (रागी) उत्पादनासाठी ज्या-ज्या बाबी करणे शक्य आहे, त्या केल्या जाणार आहेत. बाजरीचे उत्पादन वाढीसाठी कृषी खाते कटिबद्ध आहे. याशिवाय शालेय मुलांना बाजरीच्या शेतांत सहली आयोजीत कराव्यात, बाजरीच्या शेतीपासून ते उत्पादन निघेपर्यंतची मुलांना माहिती असावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com