Goa News : ‘आमुरचंवर’ लेखसंग्रह ठरेल भावी पिढीसाठी मार्गदर्शक: मिनाक्षी मार्टिन्स

Goa News : माधव बोरकर म्हणाले की, या पुस्तकातील आशय नावातच आहे. हे पुस्तक आपल्या जीवनाकडे व आमच्या भोवतालच्या परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी देते. या पुस्तकामुळे आमच्या लहानपणातील स्मृती जागृत झाल्या.
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

सासष्टी, हर्षा शेट्ये यांचा आमुरचंवर हा लेख संग्रह युवक व भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असे अनेक वक्त्यांनी आपले विचार प्रकट करताना सांगितले. या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी मडगावच्या रवींद्र भवनात झाले.

यावेळी ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक माधव बोरकर हे प्रमुख पाहुणे, अभिनेत्री तथा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिनाक्षी मार्टिन्स, कोकणी साहित्यिक मानसी धाऊस्कर यांची उपस्थिती होती. गोव्याचा समृद्ध वारसा व श्रीमंत संस्कृती याचे हर्षा यांनी या पुस्तकात अप्रतिम रित्या शब्दांकन केल्याचे वक्त्यांनी सांगितले.

माधव बोरकर म्हणाले की, या पुस्तकातील आशय नावातच आहे. हे पुस्तक आपल्या जीवनाकडे व आमच्या भोवतालच्या परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी देते. या पुस्तकामुळे आमच्या लहानपणातील स्मृती जागृत झाल्या. पूर्वीचे जेवण खाण, भांडी, परिसर, वेगवेगळ्या भाज्या व इतर वस्तूंचे वर्णन या पुस्तकात आहे.

डॉ. मिनाक्षी मार्टिन्स म्हणाल्या की, गोवा संपूर्ण बदलेला आहे. पूर्वीचे गाव आता राहिलेले नाहीत. गोव्यात कोकणी लिहिणारे व बोलणारे पुष्कळच कमी झालेले आहेत. आम्ही पूर्वीच्या वस्तू विसरलेलो आहोत.

Goa
Goa Rain Update : पावसाळ्यातील आव्हानांसाठी सज्ज राहा! संदीप जॅकीस यांच्या सूचना

आमचा वारसा, संस्कार, प्रथा, परंपरा, लहानपणी आम्ही जगलेले क्षण या पुस्तकांत सापडतात असे त्या म्हणाल्या. मानसी धाऊस्कर यांनी या पुस्तकाची ओळख करून देताना हे पुस्तक कोकणी साहित्याला आगळी वेगळे योगदान देणारे ठरणार आहे, असे सांगितले. या पुस्तकात विविध विषयांवरील २० लेख असून हे लेख जीवनातील गाठोडे असल्याचे त्यांनी सांगितले. युवक व भावी पिढीसाठी हे पुस्तक निश्र्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे असे त्या म्हणाल्या.

लेखिका हर्षा सदगुरू शेट्ये यांनी हे पुस्तक कोकणी स्पिक्स या व्हॉट्सअप व फेसबूक ग्रुपला अर्पित केले. हे पुस्तक आपल्या हृदयाच्या अगदी जवळचे असल्याचेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन मंजूषा तळावलीकर यांनी केले. संजना प्रकाशनाच्या दिनेश मणेरकर यांनी स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com