Amardeep Popkar: 'लक्ष्य तो हार हाल मे पाना है'! माडावरून पडला, इस्‍पितळात 6 महिने; डिचोलीच्या 'अमरदीप'ने मॅरेथॉनमध्ये रचला विक्रम

Amardeep Popkar Bangalore Marathon: साधारणतः तपभरापूर्वी माडावरून पडल्याने अमरदीप पोपकर याच्या मणक्याला जबर दुखापत झाली होती. सुमारे सहा महिने रुग्णशय्येवर काढावे लागले.
Amardeep Popkar | Bangalore Bamboo Ultra 161 km
Amardeep Popkar | Bangalore Bamboo Ultra 161 kmDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: साधारणतः तपभरापूर्वी माडावरून पडल्याने अमरदीप पोपकर याच्या मणक्याला जबर दुखापत झाली होती. सुमारे सहा महिने रुग्णशय्येवर काढावे लागले. उठून बसणेही शक्य नव्हते. परावलंबी अवस्थेत मनात नैराश्य असताना ही आयुष्यात नवी पहाट उगवली. योग्य उपचाराअंती तो स्वत:च्या पायांवर उभा राहिला आणि  पुन्हा धावू लागला. दुर्दम्य आशावाद, कणखर मनोबल आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या बळावर त्याने मॅरेथॉन धावपटू या नात्याने छाप पाडली. 

शनिवारी बंगळूर बांबू अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये लामगाव-डिचोली येथील अमरदीप याने कमाल केली. एकूण १६१ किलोमीटरची धावणे शर्यत त्याने ३०.३२ तास वेळेत पूर्ण केली. तो पुरुष गटात तिसऱ्या क्रमांकाचा धावपटू ठरला.

या यशस्वी कामगिरीसंदर्भात तीस वर्षीय धावपटू म्हणाला, की उच्च माध्यमिक विद्यालयात असताना माडावरून पडणे जीवावर बेतले होते. दुखापतग्रस्त असताना भविष्याबाबत समोर अंधार होता. मात्र, डॉ. बोनी परेरा आणि डॉ. रायन परेरा यांचे वैद्यकीय उपचार आणि परमेश्वराची कृपा यांमुळेच पुन्हा धावू शकलो. या वाटचालीत कुटुंबीयांची भक्कम साथ मिळाली.

अमरदीप याने बंगळूर येथे सलग दुसऱ्या वर्षी अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. गतवर्षी तो १०० किलोमीटर धावला होता. याविषयी तो म्हणाली, की ‘‘ही शर्यत खूप खडतर असते. भरपूर परिश्रम घ्यावे लागतात; परंतु मी ध्येयापासून हटलो नाही.

माझ्या गावातील आता बंद असलेल्या खाण परिसरातील उंच- सखल, डोंगराळ भागात धावण्याचा सराव केला. पोलिस दलात कार्यरत असल्याने सरावासाठी वेळ कमीच मिळायचा. त्यामुळे रात्री-अपरात्री सुसाट धावलो. त्याचा फायदा झाला.’’ यापूर्वी अमरदीपने राष्ट्रीय पातळीवरही धावपटू या नात्याने गोव्याचे प्रतिनिधित्वही केले आहे.

Amardeep Popkar | Bangalore Bamboo Ultra 161 km
GST on Sports: क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी, सामने पाहणं आणखी महाग होणार, तिकिटांच्या किमतींवर इतका GST आकारला जाणार

लहानपणी कृश, आता कमावली शरीरयष्टी 

अमरदीपच्या चारही बहिणी थोरल्या. तो सर्वांत लहान.  बालपणी तो खूपच कृश, तरी अतिशय चिवट होता. आता त्याने सुदृढ शरीरयष्टी कमावली आहे. २०१९ मध्ये तो गोवा पोलिस दलात कॉन्स्टेबलपदी रुजू झाला. नंतर एटीएस कमांडोचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. सध्या अमरदीप सीआयडी विभागात कार्यरत आहे. माजी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी खूप प्रोत्साहन दिले, असे अमरदीपने नमूद केले.

Amardeep Popkar | Bangalore Bamboo Ultra 161 km
High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

लहानपणीच गमावले वडिलांचे छत्र 

घरच्या परिस्थितीविषयी अमरदीप म्हणाला, की मी पूर्वप्राथमिक शाळेत शिकत असताना वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची. आईने पाच भावंडांचे पालनपोषण करण्यात खूप संघर्ष केला. शाळेत असताना मी एका धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. त्यावेळी शिक्षकांनी ‘मी चांगला धावपटू बनू शकतो’ असा सल्ला दिला. तेथूनच माझ्या धावपटू कारकिर्दीचा शुभारंभ झाला. राज्यभरात बऱ्याच मॅरेथॉनमध्ये मी भाग घेतला. पूर्वी सरावासाठी पेडे- म्हापसा येथे यावे लागायचे. त्यावेळच्या घरच्या बिकट परिस्थितीमुळे प्रवासासाठी लागणारे २० रुपयेही नसायचे. तरीही धावण्याचे वेड मी कायम राखले. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हे ब्रीद माझ्याबाबत सार्थ ठरले  आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com