Goa News : पणजीत अखिल गोवा सोलो तबला वादन स्पर्धा

ही स्पर्धा रविवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दयानंद स्मृती गोमंतक मराठा समाज सभागृह पणजी येथे होणार आहे.
All Goa Solo Tabla Competition
All Goa Solo Tabla CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News : पणजी, गोमंतक मराठा समाज तिसवाडी तालुका समितीतर्फे कै. गजानन शांताराम आमोणकर यांच्या स्मरणार्थ अखिल गोवा सोलो तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा रविवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दयानंद स्मृती गोमंतक मराठा समाज सभागृह पणजी येथे होणार आहे.

या स्पर्धेत १२ ते १८ वर्षांपर्यंत मुले भाग घेऊ शकतात. ही स्पर्धा सर्व समाजातील मुलांसाठी खुली आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत गोमंतक मराठा समाजाच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात येतील.

परंतु स्पर्धेच्या नियमाप्रमाणे प्रथम येणाऱ्या फक्त २० प्रवेशिकांना मंजुरी देण्यात येईल, याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी, असे आयोजकांतर्फे जाहीर केले आहे.

All Goa Solo Tabla Competition
National Sports Competition : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ‘फातोर्डा’ सजतेय ; रस्त्यांचे नूतनीकरण सुरू

स्पर्धेत प्रथम- ५,००० रुपये व चषक, द्वितीय- ४,००० व चषक, तृतीय- ३,००० व चषक आणि उत्तेजनार्थ १,००० रुपयांची प्रत्येकी ३ बक्षिसे तसेच प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तिपत्र देण्यात येईल. स्पर्धेच्या अटी'', नियम व इतर सविस्तर माहितीसाठी सुनिता पेडणेकर, नरेश आमोणकर, महेश्वरी वळवईकर यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com