37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चारही क्रीडा प्रकारांना संधी मिळण्याची शक्यता

गोव्यातील क्रीडा स्पर्धेमध्ये 37 क्रीडा प्रकार निश्चित आहेत.
37th National Games
37th National GamesDainik Gomantak

37th National Games : गोव्यातील आगामी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेमक्या कुठल्या नवीन क्रीडा प्रकारांना संघी दिली जाईल हे नक्की सांगता येत नसले तरी नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये पेेंचाक सिलट, रोल बॉल, स्क्वे मार्शल आर्ट व लोगोरी या चार क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके झाली व या चारही क्रीडा प्रकारांनी संधी मिळण्याची शक्यता प्राप्त झाली आहे.

या प्रसंगी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे जे तीन प्रतिनिधी उपस्थित होते त्यातील कार्यकारी समितीतील सदस्य अमिताभ शर्मा यानी सांगितले की कुठल्या व किती क्रीडा प्रकारांना संधी द्यायची असे नियमात काहीही नाही. गोव्यातील क्रीडा स्पर्धेमध्ये 37 क्रीडा प्रकार निश्चित आहेत.

37th National Games
Zambavali shigmotsav : श्री दामबाब अन्‌ कलाकारांतला दुवा ‘हरदास’

आता त्यात कदाचित दोन किंवा चार नवीन क्रीडा प्रकारांनाही संधी मिळू शकते. हा निर्णय भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या तांत्रिक समितीने घ्यायचा आहे. मात्र मूळ भारतीय व देशामध्ये जास्तित जास्त राज्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या व खेळत असलेल्या क्रीडा प्रकारांना संधी देणे हे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे उद्दीष्ट आहे असे ते म्हणाले.

पुण्यातील ज्या व्यक्तीने रोल बॉल खेळाची संकल्पना मांडली व ती 20 वर्षापुर्वी प्रत्यक्षात आणली ते राजू दाभाडे या वेळी उपस्थित होते. त्यानी सांगितले की या खेळाची सुरवात देशात 2003 साली सुरवात झाली. सद्या 25 राज्ये या क्रीडा प्रकारामध्ये भाग घेत आहेत.

रोल बॉल महासंघाचे 30 राज्ये सदस्य आहेत. शिवाय भारताव्यतिरिक्त इराण, केनया, डेनमार्क, बेलारुस मिळुन 40 देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. भारतात या खेळात महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, आसाम अग्रेसर आहेत अशी माहिती त्यानी दिली. रोल बॉल चे सहावे वर्ल्ड कप स्पर्धा 21 ते 26 एप्रिल दरम्यान होणार आहे. 

हा खेळ भारतात लोकप्रिय होत आहे. जर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याचा समावेश केला तर ऑलिंपिक मान्यता मिळणे सुद्धा सुकर होणार असल्याचे दाभाडे यानी सांगितले.

गोव्याच्या स्क्वे मार्श आर्ट असोसिएशनचे सचिव काशिनाथ नायक यानी सांगितले की, भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या प्रतिनिधींना आम्ही या खेळाचा इतिहास, पार्श्र्वभुमी, महत्व, लोकप्रियता बद्दलची लेखी माहिती दिली आहे.

गोव्याच्या संदर्भात बोलताना त्यानी सांगितले की, गोव्याने वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकुण 1009 सुवर्ण, 458 रौप्य, 389 कांस्य मिळून एकुण 1856 पदके जिंकली आहेत. या खेळासाठी एकुण 20 सुवर्ण, 20 रौप्य व 40 कांस्य मिळून 80 पदके असतील. जर राष्ट्रीय स्पर्धेत या खेळाचा समावेश झाला तर गोव्याला जास्तीत जास्त पदके जिंकून देण्याची क्षमता गोव्यातील स्क्वे मार्शल आर्ट खेळाडूंकडे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com