Agonda News : मुडकूड-आगोंदच्या समस्या सुटणार; सभापती तवडकर यांची ग्वाही

Agonda News : यावेळी पाणी पुरवठा, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Agonda
Agonda Dainik Gomantak

Agonda News :

आगोंद पंचायत क्षेत्रातील मुडकुड प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी सभापती रमेश तवडकर यांनी ग्रामस्थ व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. येथील विविध समस्यांवर यशस्वी तोडगा काढण्यात येईल, असे यावेळी तवडकर यांनी सांगितले.

यावेळी पाणी पुरवठा, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या भागात गढूळ पाणी पुरवठा होतो, याबाबत नागरिकांनी तक्रार केली. त्यानंतर तवडकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत येथील पंप हाऊसचे निरीक्षण केले. तेथील व्यवस्था बघून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ही व्यवस्था सुधारण्यासाठी जे काही करायचे ते करा, अन्यथा कारवाई करणार असल्याचे सुनावले.

Agonda
Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाल्यावर येथील विजेची समस्या सुटेल, असे तवडकर यांनी सांगितले. यावेळी चर्चेत पंच करुणा फळदेसाई, स्थानिक तुळशीदास फळदेसाई, गणपत नाईक देसाई, किशोर, केतन, प्रकाश फळदेसाई, देविदास नाईक देसाई,

अभिषेक फळदेसाई, श्वेतल फळदेसाई, स्टीव्ह रॉड्रिक्स, प्रसन्न नाईक देसाई, राजय फळदेसाई, साईनाथ फळदेसाई, आनंद फळदेसाई व इतर स्थानिक नागरिकांनी भाग घेतला.

नागरिकांच्या तक्रारी

पावसाळ्यापूर्वी धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली.

तसेच या भागातील गटारांची सफाई अजून सुरु न झाल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे थोडा उशीर झाला असून हे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com