Agonda News : मल्लिकार्जुन देवस्थान षष्ठीची जत्रा आजपासून

Agonda News : पहाटे सर्व सुवासिनी दिवज आपल्या घरवय-मठाजवळ प्रज्वलित करतील व मंदिर परिसरात एकत्र येऊन दिवजांच्या भोंवरीत सामील होतील.
Agonda
Agonda Dainik Gomantak

Agonda News :

आगोंद, श्रीस्थळ, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा शिमगोत्सव तसेच षष्ठीची जत्रा उद्या शुक्रवार २९ ते ३१ मार्चपर्यंत साजरी करण्यात येईल.

शुक्रवार २९ रोजी दिवजांची सेवा अर्पण करणाऱ्या सुवासिनींचा दिवजांचा उपवास असेल. तसेच मंदिरात अभिषेक व रात्री पालखी मिरवणूक होईल. शनिवार ३० रोजी सकाळी दिवजांची मिरवणूक व भोंवरी होईल.

पहाटे सर्व सुवासिनी दिवज आपल्या घरवय-मठाजवळ प्रज्वलित करतील व मंदिर परिसरात एकत्र येऊन दिवजांच्या भोंवरीत सामील होतील. तसेच मंदिरास प्रदक्षिणा काढतील. याच दिवशी महाजनांचे लहान मुले आपली “गुढी सेवा” श्री चरणी अर्पण करतील. संध्याकाळी गुलालोत्सव साजरा केला जाईल. रात्री पालखी व नंतर खोलकर बंधुंकडून सुवारी वादनाचा कार्यक्रम होईल.

रविवार ३१ रोजी षष्ठीची जत्रा होईल. यानिमित्त सकाळी शेलच्या भोंवरी कार्यक्रम होईल. नवीन लग्न झालेल्या पुरुषांनी आपल्या पाठीवर सुई व दोरा टोचून घेण्याची “शेली” नावाची प्रथा इथे पाळली जाते. श्री अवतार पुरुषाची तरंगे मंदिर परिसरात ढोलांच्या तालावर नाचविली जातील.

नंतर तुलाभार सेवा कार्यक्रम पार पाडला जाईल. दुपारी २ वाजता राजांगणात अवतार पुरुषाचा अवसर व भक्तगणास कौल प्रसाद दिला जाईल. रात्री तरंगाचे विसर्जन व षष्ठीच्या जत्रेची सांगता होईल.

उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यकारी समिती, किंदळेकर देसाई व नगर्सेकर देसाई कुटुंबाचे प्रतिनिधी, वांगडी व महाजन प्रयत्नशील आहेत. मोठ्या संख्येने हजर राहून शिस्तीत व शांततेने कौल घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष विठोबा देसाई व अन्य पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.

Agonda
Delhi Goa Flight: दिल्ली-गोवा फ्लाइटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; राजस्थानच्या प्रवाशाविरोधात गुन्हा

गावडोंगरी येथे आज भोंवरी मिरवणूक

काणकोण : गावडोंगरी येथील मल्लिकार्जुन देवालयात शुक्रवारी (ता.२९) सकाळी ९.३० वाजता शेलची भोंवरी, अवतार, कौल व त्यानंतर टका वाचनहोईल.

आज गुरुवारी (२८) दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी अवतार व कौल प्रसाद झाला. बुधवारी दिवजांचा उपवास, पालखी मिरवणूक, रंगावली पूजा व तीर्थप्रसाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com