Agonda News : मास्तिमळमध्ये वानराचा हैदोस; नागरिक जखमी

Agonda News : बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
Agonda
AgondaDainik Gomantak

Agonda News :

आगोंद, काणकोण पालिका क्षेत्रातील मास्तिमळ प्रभागात गेल्या आठ दिवसांत दर दिवशी किमान दोघा-तिघांना एक जंगली वानर पाठीमागून हल्ला करत असून त्यांना इस्पितळात उपचारार्थ काणकोण इस्पितळात दाखल करावे लागत आहे.

वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या तक्रारीनंतर त्याल पकडण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ते वानर मोकाट आहे. अद्याप वनाधिकाऱ्यांना ते सापडे नाही. या वानराचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक धिरज‌ नाईक गांवकर व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

वानर गेल्या दिड महिन्यापासून अधूनमधून नागरिक व कुत्रे यावर बेसावध असताना हल्ला करून जखमी करत आहे. आत्तापर्यंत वानराने एका नागरिकाला शौचालयाचे दार उघडताना पाठीमागून हल्ला केला तर अन्य एक महिलेच्या मानेला ओरबाडले.

दोघा-तिघा भाडेकरू परप्रांतीय युवकांना जखमी केले आहे. एकाच्या हाताला तर एकाच्या पोटाला १३ ते १७ टाके पडले आहेत. अन्य एका युवकाच्या डोक्याला चावा घेतल्यामुळे त्याला ७ टाके‌ पडले आहेत, अशा प्रकारे अनेकांना वानराने जायबंदी केले आहे.

यासंबंधीची तक्रार काणकोण वनखात्याच्या कार्यालयात सादर केल्यानंतर वनखात्याची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाली. या वानराला गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून पकडण्यासाठी उपाय योजना केली असून वानर अद्याप त्यांच्या हाती लागले नाही.

एकदा वानराने इंजेक्शन शरीराला लागताक्षणी काढून फेकले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी काट्याकुट्यातून धावपळ केली, मात्र तो काही हाती लागला नाही. सकाळच्या वेळी दूरवर पळाला खरा मात्र तिन्ही सांजेला परत त्या भागात पुन्हा दिसला, अशी माहिती नगरसेवक नाईक गांवकर यांनी दिली.

Agonda
Goa Theft Case: भाटले-पणजीत 12 लाखांची चोरी; गाझियाबाद, दिल्लीतील दोघांना अटक, सात दिवसांची कोठडी

त्वरित कृती हवी!

नगरसेवक धिरज नाईक गांवकर म्हणाले, मोठ्या शिताफीने या वानराचा बंदोबस्त करावा लागेल. गरज भासल्यास स्थानिक नागरीक सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहेत. मात्र कोणाच्याही जिवावर बेतण्यापूर्वी यावर तोडगा काढण्यात यावा. दुर्घटना घडण्याची पूर्वीच संबंधितांनी सतर्क होऊन त्वरित कृती करावी, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com