Agonda News : श्रमदानातून निराधार महिलेला घर; कार्यकर्त्यांचा सहभाग

Agonda News : बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या श्रम-धाम अभियानाअंतर्गत काम
Agonda
Agonda Dainik Gomantak

Agonda News :

आगोंद, श्री बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या श्रम-धाम अभियानाअंतर्गत तळपण येथील रूपा मैत्री या निराधार महिलेच्या घराच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी सकाळी आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भाजप महिला मंडळ अध्यक्षा विंदा सतरकर, दक्षिण गोवा भाजप उपाध्यक्ष महेश नाईक, मंडळाचे सरचिटणीस दिवाकर पागी, माजी जि.प. सदस्य पुष्पा अय्या, खोतिगांवचे सरपंच आनंदू देसाई, श्रीस्थळच्या सरपंचा सेजल‌ गावकर, पैंगीणच्या सरपंचा सविता तवडकर, उपसरपंच सुनील पैंगीणकर, लोलयेंचे उपसरपंच चंद्रकांत सुधीर,

विनय तुबकी, नारायण देसाई, अजित पैंगीणकर, दिनेश नाईक, अशोक वेळीप, कृष्णा गावकर, जयेश वेळीप, गणेश गावकर, साहिल देसाई, राजेश बांदेकर, अजय लोलयेंकर, सचिन नाईक, रजनीश‌ गावकर, अशोक गावकर, सुनील पैंगीणकर, सतीश वेळीप, अंजली वेळीप, अस्मिता जोशी, अंजली गांवकर आदी उपस्थित होते.

यापूर्वी या अभियानातून २० घरे बांधण्यात आली आहे. तसेच तिर्वाळ येथील एका सरकारी प्राथमिक शाळा इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहचलेले आहे. तसेच पाळोळे, पापणे चिंचात, खोतिगांव व गावडोंगरी आदी भागात काही घरे लवकरच उभारण्यात येणार आहे.

अत्यंत गरीब तसेच कमजोर घटकांसाठी श्री बलराम चॅरिटेबल ट्रस्टमार्फत श्रमदानातून ही घरे बांधून देण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत येत्या काळात १ हजार घरे उभी राहिली तरी कोणाला आश्चर्य वाटू नये, असे रमेश तवडकर यांनी यावेळी सांगितले.

कोण आहेत रूपा मैत्री?

रूपा मैत्री या मुळ रिवण, सांगे येथील असून लग्नानंतर तळपण येथे आपल्या सासरी लहानशा घरात पती, दीर व सासू यांच्या समवेत काबाड कष्ट करून जीवन जगत होत्या. लग्नानंतर दोन महिन्यात सासूचे अपघाती निधन झाले.

त्यानंतर वर्षभरात आजारपणात पतीचेही निधन झाले. दिराचे लग्न झाले. पक्के घर नसल्यामुळे तिची कुचंबणा होत होती. पावसाळ्यात खूपच हाल‌ होत असत असे त्या सांगतात. स्थानिक पंच अस्मिता जोशी व अन्य कार्यकर्त्यांनी याबाबत तवडकर यांना कळवले. तवडकर यांनी मैत्री यांची भेट घेतली व बलराम चॅरिटेबल ट्रस्टमार्फत नवे घर बांधून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार रविवारी या कामाला सुरवात करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com