Goa Accident: शिरदोन अपघातप्रकरणी आगशी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

Goa Accident: डिसेंबर २०२३ मध्ये शिरदोन येथे झालेल्या अपघातात संजना सावंत (वय २२) या युवतीचा मृत्यू झाला होता, तर बहीण अक्षता सावंत गंभीर जखमा झाली होती.
Agacaim Police filed charge sheet against Omkar Aroskar in Sanjana Sawant accident case
Agacaim Police filed charge sheet against Omkar Aroskar in Sanjana Sawant accident caseDainik Gomantak

Goa Accident: डिसेंबर २०२३ मध्ये शिरदोन येथे झालेल्या अपघातात संजना सावंत (वय २२) या युवतीचा मृत्यू झाला होता, तर बहीण अक्षता सावंत गंभीर जखमा झाली होती. आज अखेर अपघाताच्या (Accident) पाच महिन्यानंतर आगशी पोलिसांनी संशयित ओमकार आरोस्कर याच्या विरोधात आगशी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोस्कर याने अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

आगशी पोलिसांकडून (Police) आरोपपत्र दाखल करण्यात विलंब होत असल्याने अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धडक दिली होती. आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना सात दिवसांची मुदत दिल्यानंतर साहाय्यक अधीक्षक सुलेखा जगरवाल यांनी दिलेला शब्द राखून आरोपपत्र दाखल केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकोणकर आणि शंकर पोळजी यांनी सुलेखा जगरवाल, उपनिरीक्षक स्वप्निल नाईक व इतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Agacaim Police filed charge sheet against Omkar Aroskar in Sanjana Sawant accident case
Goa Accident: राज्यात दर 27 तासांनंतर एक अपघाती मृत्यू; रस्ते सुरक्षा संस्कृती रुजवणे काळाची गरज

१२ डिसेंबर २०२३ सकाळी आपल्या बहिणीला पिलार येथील उच्च माध्यमिक शाळेत सोडण्यासाठी जाताना शिरदोन येथे संजना आणि ओमकारच्या दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com