Hill Cutting : हरमल पाठोपाठ मांद्रे गावातही डोंगर कापणीच्या घटनांना ऊत

महसूल निरीक्षक आणि तलाठी अशा प्रसंगी काय करतात? असा प्रश्न मनोज परब यांनी विचारलाय
Hill Cutting
Hill Cutting
Published on
Updated on

Hill Cutting सध्या बेकायदेशीर डोंगर कापणीचे प्रकार वाढले आहेत. हरमल येथील वाघ कोळंब अर्थात स्वीट लेक परिसरात अज्ञाताने डोंगर कापणी करून हट्स (झोपड्या) थाटल्या आहेत.

त्याप्रमाणेच सांडपाणी उघड्यावर व लेकमध्ये सोडल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक व्हिन्सेंट मास्कारेन्हस यांनी केली होती. ही घटना ताजी असतानाच हरमल लगतच्या मांद्रे गावात डोंगर कापणीचा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

या संबंधी आरजीचे मनोज परब यांनी नगर विकास नियोजन विभागाला ट्विटच्या माध्यमातून धारेवर धरले आहे. तुमचे कर्मचारी स्वतःहून हे डोंगर कापण्याचे प्रकार कधी थांबवणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तसेच महसूल विभागाला देखील, ''तुमचे महसूल निरीक्षक आणि तलाठी अशा प्रसंगी गप्प कसे काय राहतात? तुमचे हे अधिकारी काय करतात''? असा प्रश्न परब यांनी केलाय.

Hill Cutting
Goa News : पणजीत रस्ते दुरुस्तीचे काम सुरु | Road repair work starts in Panaji | Gomantak Tv

या अगोदर बऱ्याचदा मनोज परब यांनी बेकायदेशीर डोंगर कापणी विरोधात आवाज उठवला आहे. तळावली येथे बेकायदेशीरपणे चाललेली डोंगर कापणी रिव्हॉल्युशनरी गोवन्सने बंद पाडली होती.

या संदर्भात आरजीने तक्रार केल्यावर या डोंगर कापणी ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. भाजप सरकारच्या काळात डोंगर कापणी सारखी पर्यावरणचा विध्वंस करणारी कामे खुलेआम सुरु असून यावर कुणाचाही अंकुश राहिला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com