वामनराव सरदेसाईंवर कादंबरी, चित्रपट हवा : ॲड. रमाकांत खलप

मान्यवरांच्या हस्ते ‘माओम्बी’ आणि ‘वज्राची खाण’ पुस्तकांचे प्रकाशन
On the release of Vaman Sardesai book
On the release of Vaman Sardesai bookSandip Desai
Published on
Updated on

वामनराव सरदेसाई यांच्याकडून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्फूर्ती घेतली. गोव्याच्या मुक्तीसाठी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ केली असे सांगणाऱ्या त्यांच्या पत्नी लिबिया लोबो सरदेसाई यांचा अभिमान वाटतो, त्यांच्या जीवनावर कादंबरी, चित्रपट यायला हवा, वामनरावांची जन्मशताब्दी वर्षभर साजरी व्हायला हवी, असे मत माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी येथे व्यक्त केले.

वामन सरदेसाई मेमोरियल ट्रस्ट आणि वेदांता इन्स्टिट्यूट यांच्या विद्यमाने शुक्रवारी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुरेंद्रबाबू तिंबलो सभागृहात स्वातंत्र्यसैनिक, कवी, अंगोलाचे भारतीय राजदूत म्हणून काम पाहिलेले वामन बाळकृष्ण प्रतापराव सरदेसाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ॲड खलप प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी दशरथ परब व इतरांच्या हस्ते यांच्या हस्ते ‘माओम्बी’ आणि ‘वज्राची खाण’ या वामानराव यांच्या एकत्रित दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष कवी दशरथ परब (आयएमबीचे अध्यक्ष), समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत, साहित्यिक दिलीप बोरकर व लिबिया लोबो सरदेसाई उपस्थित होत्या.

On the release of Vaman Sardesai book
आदिवासी क्रीडापटूंसाठी कौशल्य, गुणवत्तेची संधी : क्रीडामंत्री गोविंद गावडे

दशरथ परब म्हणाले, स्वातंत्र्य सैनिक म्हणून वामनराव यांचे कार्य तर मोठे होतेच, परंतु त्यांच्या पत्नी लिबिया यांचेही कार्य लक्षवेधी ठरले. परब यांनी, त्याकाळी मगोचे काही आमदार फुटले होते आणि सर्किट हाऊसवर जमले असता कार्यकर्ते खवळले होते, तेव्हा जिल्हाधिकारी वामनराव यांना मी प्रथम पाहिले असे सांगितले. त्यांचे जीवन कार्य नव्या पिढीसमोर येण्यासाठी अभ्यासक्रमातील भाषा विषयात त्यांचा समावेश व्हायला, अशी सूचनाही त्यांनी केली.

डॉ. कोमरपंत म्हणाले, रणपर्वाचे कर्ते, द्रष्टे आणि प्रज्ञावंत असलेले वामनराव सरदेसाई हे एक उज्वल नाव. खडतर साधनेच्या पर्वात त्यांच्या पत्नी त्यांच्यासमवेत ज्वालाकमल बनून राहिल्या. त्यांचे स्मरण करणे म्हणजे नवसंजीवन आहे. त्यांची ‘माओम्बी’ ही मराठी कादंबरी उज्वल पर्वाची कहाणी आहे. बुद्धी, भावना आणि संवेदना यांचा गोफ या कादंबरीत विणला आहे. ‘माओम्बी’ आणि ‘वज्राची खाण’ (कोकणी) ही दोन पुस्तके एकत्रित प्रसिद्ध होतात, हे अद्वैताचे प्रतीक आहे.

डॉ. प्रजल साखरदांडे यांनी प्रास्ताविक केले. शकुंतला भरणे यांनी वामन सरदेसाई ऊर्फ कवी अभिजित यांच्या रचना गाऊन सादर केल्या. उमेश सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.

On the release of Vaman Sardesai book
Manohar International Airport टॉप-20 मध्ये !

उच्चप्रतीचे काव्य

रवींद्र केळेकरांमुळे वामनरावांशी स्नेह जुळला असे सांगून दिलीप बोरकर म्हणाले, वामन सरदेसाई यांची कविता ही उच्चप्रतीची आहे. त्यांच्यासारखे आदर्श आज काळाच्या पडद्याआड चाललेत त्यांचा वारसा आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणार की नाही? आज देशात बजबजपुरी माजली आहे. आम्ही मिंध्ये मतदार तयार करणार की आदर्श नागरिक घडविणार याचा विचार करायला हवा.

"वामन हे दैववादी नव्हते. पूजा, देवाला भजणे हे त्यांनी केले नाही. आपली समृद्धी समाजासाठी खर्च करावी, वेदांताचा प्रचार करावा, हे त्यांचे अंतिम ध्येय होते. ते पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, म्हणून आम्ही संस्थात्मक कार्य सुरू केले आहे. ते गांधींच्या सेवाग्राममध्ये काही काळ होते. अध्यापनही त्यांनी केले. बंगाली शिकून रवींद्रनाथ टागोरांच्या कविता कोकणीत त्यांनी आणल्या. ते शेवटपर्यंत आध्यात्मिक होते."

लिबिया लोबो सरदेसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com