Goa News : पाचशे घरमालकांवर होणार कारवाई; पोलिसांची पडताळणी मोहीम

Goa News : भाडेपट्टीवर राहणाऱ्यांमध्ये इतर राज्यातील गुन्हेगार राहत असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा चौकशीमुळे गुन्हेगार गोव्यात आश्रयस्थान घेण्याचे धाडस करणार नाही.
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

पणजी, राज्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयाचा लोंढा गोव्यात येत आहे. या परप्रांतीयांना भाडेकरू म्हणून ठेवण्यापूर्वी त्यांची माहिती जवळच्या पोलिस स्थानकामध्ये देण्याची सक्ती आहे. मात्र, ती दिली जात नाही. त्यामुळे अनेक गुन्हेगारांचे गोवा हे आश्रयस्थान बनले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी रात्रीच्यावेळी अकस्मात भाडेकरूंची पडताळणी सुरू केली आहे. पंधरवड्यात सुमारे ५ हजार जणांची उत्तर गोवा पोलिसांनी केलेल्या तपासणीत सुमारे ५०० जणांनी माहितीच दिली नाही व घरमालकांनीही ती पोलिसांना दिलेली नाही. त्यामुळे या ५०० घरमालकांविरुद्ध कारवाई होणार असून त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाचरात्री उत्तर गोव्यातील १४ पोलिस स्थानकांच्या पोलिसांमार्फत आपापल्या क्षेत्रात भाडेपट्टीवर राहाणाऱ्यांची तपासणी केली गेली. या तपासणीवेळी परप्रांतियांना भाटेपट्टीवर ठेवण्यापूर्वी त्यांची माहिती घरमालकाने जवळच्या पोलिस स्थानकात दिली आहे की नाही, भाडेपट्टीवर देण्यात आलेले घर, फ्लॅट किंवा बंगला हा बेकायदेशीर कारवायांसाठी देण्यात आलेला आहे का नाही याची चौकशी करण्यात आली.

भाडेपट्टीवर राहणाऱ्यांमध्ये इतर राज्यातील गुन्हेगार राहत असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा चौकशीमुळे गुन्हेगार गोव्यात आश्रयस्थान घेण्याचे धाडस करणार नाही. भाडेकरूंना ठेवणाऱ्या घरमालकांविरुद्ध कठोर कारवाई केल्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाहीत असे कौशल यांनी सांगितले.

Goa
Quepem Goa News : जलप्रकल्पाआडून मिराबागमध्ये पर्यटनस्थळ नकोच! ग्रामस्थांचा विरोध

गेल्या आठवड्यात ३ हजार भाडेकरूंची चौकशी

गेल्या आठवड्यात विशेष मोहीम आखून एकाच दिवशी १४ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील भाडेकरूंची चौकशी व तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी एकूण ३ हजार परप्रांतीयांची चौकशी केली गेली. या तपासणीत सुमारे १०० जणांची माहिती घरमालकांनी सुपूर्द न केल्याने त्यांच्याविरुद्धचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे. या एका रात्री पणजी पोलिसांनी सर्वाधिक ३७२ लोकांची तपासणी केली.

त्यापाठोपाठ हणजूणमध्ये २३१, म्हापशामध्ये २७४, मांद्रेमध्ये २६०, कळंगुटमध्ये २३३, साळगावमध्ये २३२, डिचोलीमध्ये २०८ त वाळपईमध्ये २३५ जणांची चौकशी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com