Parra Accident Case : पर्यटकाच्या कारची सायकलस्वार मुलाला धडक; पर्रा येथील घटना

अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले
Tragic Accident at Parra Maddani
Tragic Accident at Parra MaddaniDainik Gomantak
Published on
Updated on

Accident at Parra Goa : म्हापशातील पर्रा येथे एका पर्यटकाच्या कारची लहान सायकलस्वार मुलाला धडक बसल्याने अपघात झाला आहे. ही घटना आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेत सायकलस्वार मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पर्रा येथे आलीया आणि शाहरुखच्या 'डिअर झिंदगी' या बॉलीवूड चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. त्यामुळे येथील रस्त्यावर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. मात्र, या प्रकारामुळे तेथे वाहतूक कोंडी होत असल्याने याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो.

Tragic Accident at Parra Maddani
Goa Hit and Run Case : दाबोळीत 'हिट अँड रन'; कारच्या धडकेत विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास पर्रा येथील स्थानिक 11 ते 12 वर्षीय युवक रितेश उग्रिजा सायकलवरून शिकवणीला जात होता. यावेळी त्याच्या सायकलला पर्यटकाच्या थार कारची धडक बसली. या धडकेत रितेश शेतात खाली पडला व गंभीर जखमी झाला. गंभीर रितेशला तत्काळ जीएमसीत अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com