Verla-Canca New Sarpanch: वेर्ला-काणकाच्या सरपंचपदी आरती च्यारी बिनविरोध

माजी सरपंचांविरोधात बिचोलकर अवैध बांधकांना पाठीशी घालत असल्याचा पाच सदस्यांचा आरोप
Verla-Canca New Sarpanch:
Verla-Canca New Sarpanch:Dainik Gomantak
Published on
Updated on

Verla-Canca New Sarpanch: बार्देश तालुक्यातील वेर्ला-काणका पंचायतीच्या सरपंचपदी आरती च्यारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पंचायतीमध्ये 9 सदस्य आहेत. त्यांनी एकमताने ही निवड केली.

पंचायतीमधील 9 पैकी 5 सदस्यांनी वेर्ला काणका पंचायतीच्या माजी सरपंच दिपाली लक्ष्मीकांत बिचोलकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता.

Verla-Canca New Sarpanch:
Tarak Arolkar: म्हापसातील नगरसेवक तारक आरोलकर यांच्या अपात्रतेसह छाननी समितीचा निर्णय रद्द

गटविकास अधिकाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात पाच सदस्यांनी माजी सरपंच दिपाली बिचोलकर यांच्यावर आरोप केले होते. सरपंच विकासकामांबाबत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. तसेच बिचोलकर अवैध बांधकामांना पाठबळ देत होत्या, असा आरोपही इतर सदस्यांनी केला होता.

आरती पवन च्यारी, वासुदेव लक्ष्मण कोरगावकर, मोहन विठ्ठल दाभाळे, दिगंबर उत्तम कळंगुटकर आणि अशोक लाडू आर्लेकर या पाच सदस्यांनी हा अविश्वास ठराव आणला होता. त्यानंतर आरती च्यारी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com