भ्रष्टाचारी भाजप सरकार बरखास्त करा:आप

राज्यपालांनी केलेली टीका गंभीर असून, सरकारविरोधात आम आदमी पक्ष आंदोलन करायला सज्ज झाला आहे
AAP demands to resign Goa Chief Minister Pramod Sawant
AAP demands to resign Goa Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील भाजप (Goa BJP) सरकार भ्रष्टाचारात बुडले असल्याची माहिती माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik ) यांनी दिल्यानंतर गोव्यात विविध राजकीय पक्षांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले असून हे सरकार त्वरित बरखास्त करावी या मागणीसाठी ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. आम आदमी पक्षाने (AAP) पणजीच्या ऐतिहासिक आझाद मैदान वर निदर्शने करत भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

सत्यपाल मलिक यांनी भ्रष्टाचाराबाबत सावंत सरकारवर टीका केली. राज्यपालांनी केलेली टीका गंभीर असून, सरकारविरोधात आम आदमी पक्ष आंदोलन करायला सज्ज झाला आहे. आपने आजपासून गोवा आपकडून कालपासूनच #ResignPramodSawant हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी प्रमोद सावंत सरकारचे (Pramod Sawant Government) अनेकवेळा कान उपटले आणि राज्यकारभाराबद्दल जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती. त्याबद्दल त्यांना गोव्यातून (Goa) अपमानित होऊन जावे लागले होते. त्याचा आज त्यांनी पूरेपूर वचपा काढताना सावंत सरकारने कोविड प्रश्न अत्यंत निष्काळजीपणाने हाताळला, इतकेच नव्हे तर या काळात धान्य वाटपात भ्रष्टाचार झाला आणि एकूणच सर्व क्षेत्रात तेथे भ्रष्टाचाराचा भस्मासुर माजला होता, असा जाहीर आरोप सावंत सरकारवर केला आहे. या मुद्यावर पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलण्याचे टाळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com