Goa's First Mohalla Clinic: आम आदमी पक्षातर्फे गोव्यात 'या' ठिकाणी सुरू झाले पहिले मोहल्ला क्लिनिक

रोगपचारांवर मोफत सल्ला आणि औषध
Goa's First Mohalla Clinic:
Goa's First Mohalla Clinic: Dainik Gomantak

Goa's First Mohalla Clinic: बाणावलीचे आम आदमी पक्षाचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनी दिल्ली आणि पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने चालविलेल्या जगप्रसिद्ध मोहल्ला क्लिनिकची सुरवात आता गोव्यात केली आहे.

या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर आमदार व्हिएगस यांनी बाणावलीत गुड हेल्थ हे क्लिनिक सुरू केले आहे. अशा पद्धतीचे राज्यातील हे पहिलेच क्लिनिक आहे.

Goa's First Mohalla Clinic:
Goa Police: मुलगी शाळेत पोहचलीच नाही, गोवा पोलिसांची उडाली झोप; तपासात समोर आले धक्कादायक कारण...

आमदार कॅप्टन व्हिएगस म्हणाले की, कोणत्याही शासकीय निधी किंवा योजनेशिवाय हे क्लिनिक सुरू केले गेले आहे. येथे रोगउपचारांबाबत मोफत सल्ला व औषध उपलब्ध करून दिले जाणार आहे. अशा पद्धतीचा हा बहुधा राज्यातील पहिलाच सार्वजनिक दवाखाना आहे.

आम आदमी पक्षाने (आप) निवडणूक प्रचारादरम्यान याबाबत वचन दिले होते. ते वचन मी सर्वात प्रथम बाणावलीत पूर्ण केले आहे. अशा उपक्रमांना प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गोव्यातील लोकांना 'आप' सरकारचे मॉडेल आवडते आहे. आणि हे मॉडेल निवडणे ही काळाची गरज आहे.

Goa's First Mohalla Clinic:
Goa News : म्हापसा येथील 21 वर्षीय युवकाचा आसगावात तळीत बुडून मृत्यू

राष्ट्रीय डॉक्टर दिनी या क्लिनिकचे उद्घाटन झाले आहे. यावेळी कॅप्टन वेगास यांच्या हस्ते डॉ. अविनाश आनंद (ऑनको आणि लॅपरोस्कोपिक सर्जन), डॉ. विकास दधिच (ऑर्थोपेडिक सर्जन) आणि डॉ. राल्फ अराऊझो (वैद्यकीय व्यवस्थापक) यांच्यासह क्लिनिकचा भाग असलेल्या डॉक्टरांचा सत्कार केला.

आमदार कॅप्टन व्हेंजी व्हिएगस यांनी क्लिनिकच्या स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. बाणावलीच्या लोकांनी याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com