Dabolim Airport: दाबोळी विमानतळ ते वेर्णा नवीन उड्डाणपूल बांधणार

माविन गुदिन्हो : नूतनीकरण केलेल्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन; वाहतूक हाेईल सुरळीत
fly over
fly overDainik Gomantak

वास्को: दाबोळी विमानतळ ते वेर्णा असा नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढील तीन महिन्यांत 550 कोटी रुपये खर्चून अंडरपास तयार केला जाईल, असा खुलासा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केला. दाबोळी येथे नव्याने नूतनीकरण केलेल्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन केल्यानंतर गुदिन्हो यांनी ही माहिती दिली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ओव्हरब्रिज ही काळाची गरज आहे.

(Dabolim Airport)

fly over
Goa Feast: फेस्त फेरी स्थगितीचा आदेश देण्याची मागणी

उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल. तसेच दाबोळी विमानतळ ते वेर्णा या नवीन उड्डाणपुलाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली असून, त्याचे काम लवकरच पूर्ण होईल. या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्यासाठी सात जंक्शन पॉइंट्सवर अतिरिक्त अंडरपासदेखील असतील, असे गुदिन्हो म्हणाले.

आल्त दाबोळी नाक्याशेजारील रेल्वे उड्डाणपुलाचे उद्‌घाटन वाहतूकमंत्री व स्थानिक आमदार माविन गुदिन्हो यांनी मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिग्स, सरपंच कमलाप्रसाद यादव, उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, पंचसदस्य पूनम च्यारी, सुनीतादेवी यादव, सपना कुराडे, शैलेश मयेकर, बोगमाळो सरपंच संकल्प महाले, उपसरपंच लॉरेना कुन्हा, पंच कायतान फिगरेदो, रेमंड कार्व्हाल्हो, नगरसेवक विनोद किनळेकर, क्रितेश गावकर, रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केले.

जुन्याच जागी नवीन पूल

दाबोळी नाक्याजवळील चौपदरी महामार्गावर एका बाजूचा उड्डाण पूल नवा असल्याने तो उंच होता. तर जुना पूल खाली होता. या महामार्गावरील हे दोन्ही पूल समपातळीवर आणण्यासाठी जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक वळविली होती. काही महिन्यांच्या कष्टानंतर हे काम पूर्ण झालेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com