Bondla Sanctuary: 'बोंडला’त आता होणार गवा पैदास विभाग

उपवनसंरक्षक : प्रस्तावाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची परवानगी
Bondla Sanctuary
Bondla SanctuaryDainik Gomantak
Published on
Updated on

बोंडला अभयारण्यात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार अनेक मोठे बदल करण्यात आले असून तिथल्या प्राणी-पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच येथे गवा पैदासीसाठी स्वतंत्र विभाग करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर गोवा उपवनसंरक्षक अनंत जाधव यांनी दिली.

बोंडला हे राज्यातील एकमेव प्राणी संग्रहालय तथा अभयारण्य आहे. येथे विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि उभयचरांना नैसर्गिक अधिवासामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार इथल्या वन्य प्राण्यांचे पिंजरे, अधिवास अधिक मोठे आणि सुसज्ज करण्यात येत आहेत.

यासाठी २० कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव आहे. यात गवे, बिबटे, सांबर, चितळ, वन मांजर, अस्वल, कोल्हे आदींसह सापांच्या काही जाती, तर काही विदेशी पक्षीही ठेवले आहेत. या अभयारण्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. सध्या पर्यटन हंगाम असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

वन खात्याच्या वतीने प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येत असून प्राण्यांना अधिक नैसर्गिक स्थितीमध्ये ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. याशिवाय नव्याने काही प्राणी, पक्षी या संग्रहालयात आणण्यात येणार आहेत.

तसा प्रस्ताव राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला पाठवला असून त्यातील काही प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. भोपाळच्या प्राणी संग्रहालयातून अस्वलांची जोडी येथे आणण्यात येणार असून त्या बदल्यात गव्याची जोडी त्या संग्रहालयाला देण्यात येणार आहे. अन्य काही प्राणी संग्रहालयांतून वाघाची जोडी आणण्याचा प्रस्ताव असून सध्या तो मंत्रालयाकडे आहे.

Bondla Sanctuary
Bike rally: महिला दिनानिमित्त दुचाकी रॅली

वाघांचे आकर्षण कायम

देशभरातील सर्वच प्राणी संग्रहालयांमध्ये वाघांचे आकर्षण कायम आहे. वाघांसाठी म्हैसूरबरोबर नागपूर आणि नंदन कानन प्राणी संग्रहालयामध्ये माहिती घेण्यात आली आहे. 2009 मध्ये विशाखापट्टणम येथून आणलेली संध्या आणि राणा ही वाघाची जोडी सर्वांचे आकर्षण ठरली होती. मात्र, संध्या 2016 साली आणि राणा 2018 मध्ये मरण पावल्याने गेल्या चार वर्षांपासून वाघांचे पिंजरे रिकामेच आहेत.

Bondla Sanctuary
Margao Municipality: राखीव निधीतून देणार कर्मचाऱ्यांचे वेतन!

151 जातींचे विविध प्राणी, पक्षी

सध्या बोंडला प्राणी संग्रहालयात 24 जातींचे 102 सस्तन प्राणी आहेत. तसेच सहा प्रजातींचे24 पक्षी तर 14 जातींचे 24 उभयचर प्राणी या संग्रहालयात आहेत. लवकरच यात अस्वलांची भर पडणार आहे.

गवा मादीला पिले : बोंडला अभयारण्य आणि प्राणी संग्रहालयास गवा पैदास केंद्रासाठी प्राधिकरणाची मान्यता मिळाली आहे. यासाठी स्वतंत्र गवा पैदास केंद्र उभारण्यात येत असून या प्राणी संग्रहालयात अनेक मादी गव्यांनी पिलांना जन्म दिला आहे. गेल्या सोमवारीही एका गव्याचा जन्म झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com