Bootlegger On The Run Arrested From Goa: गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा आणि सौराष्ट्रमध्ये विदेशी दारु पाठवणाऱ्या मुख्य तस्करापैकी एक असलेल्या भरत उर्फ भुराजी डांगी याला स्टेट मॉनिटरिंग सेलने (SMC) पणजीतील एका हॉटेलमध्ये टाकलेल्या छाप्यात अटक केली. यावेळी त्याच्याकडून दोन मोबाईलसह 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एसएमसीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर गुजरातमध्ये 50 हून अधिक दारुबंदीचे गुन्हे दाखल आहेत. 2022 पासून अहमदाबाद शहर, अहमदाबाद ग्रामीण, पंचमहाल, अरवली, साबरकांठा आणि वडोदरा शहरात नोंदवलेल्या नऊ प्रकरणात त्याचे नाव होते.
गुजरातमध्ये विदेशी दारु पाठवणाऱ्या मुख्य तस्करांपैकी तो एक होता. गुजरातच्या (Gujarat) पोलीस महासंचालकांनी त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान, आरोपी गोव्यातील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तात्काळ छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, एसएमसीच्या पथकाने पणजी येथील हॉटेल द क्रिसेंटवर छापा टाकून आरोपीला (भरत) ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पणजीहून गुजरातला आणण्यात आले. वडोदरा शहरातील हर्णी पोलिस ठाण्यात 2022 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात मंगळवारी त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणात 17122 विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या, ज्याची किंमत 18.30 लाख रुपये होती. या बाटल्यांसह एकूण 26.38 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. विदेशी दारुची ही खेप आरोपी भरतनेच पाठवली होती.
पुढील तपासासाठी आरोपीला वडोदरा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुजरातमध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत SMC ने 77 वाँटेड आरोपींना अटक केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.