कोंकण रेल्वेच्या मार्गाचे गोव्यात 95 टक्के विद्युतीकरण पूर्ण

200 कोटी रुपयाची बचत कोकण रेल्वेला दरवर्षी होणार आहे
Konkan railway
Konkan railwayDainik gomantak
Published on
Updated on

फातोर्डा : कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वे कॉरपरेशनला दरवर्षी 200 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाचे 95 टक्के काम पुर्ण झाले असल्याची माहिती कोकण रेल्वे जनसम्पर्क अधिकारी बबन घाटगे यांनी माहिती देताना दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सर्व ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. यातील काही ठिकाणी रेल्वे (Railways) सेफ्टी बोर्डकडून चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर या ठिकाणाच्या मार्गांना हिरवा कंदील देण्यात येणार आहे. यात कारवार ते वेर्णा या मार्गाचा समावेश आहे.

Konkan railway
गोव्यात कोरोनाचा कहर; राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 45.78%

कोकण रेल्वे मार्गाच्या अंतर्गत येत असलेल्या दक्षिण विभागीय मार्गावरली कारवार ते मेंगलोर दरम्यान संपूर्ण काम पूर्ण होऊन विद्युतीवर चालणाऱ्या रेल्वेची सुरुवातही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच कारवार ते रत्नागिरी (Ratnagiri) या मार्गावरील काम काही प्रमाणात शिल्लक आहे. तेही येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. याबरोबरच विद्युती वर चालणाऱ्या मालगाड्या काही ठिकाणी सुरु करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. या पूर्वी कोकण रेल्वे मार्गावर इंधन भरीत गाड्या चालवण्यात येत असल्याने 300 कोटी रुपयांचा आस पास खर्च येत होता, सर्व ठिकाणी विद्युतीवर चालणाऱ्या रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर 200 कोटी रुपयाची बचत कोकण रेल्वेला दरवर्षी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com